बादशाहत संपली! सामना जिंकूनही टीम इंडियाचं मोठं नुकसान

केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास रचल्यानंतरही टीम इंडियाच्या पदरी मात्र निराशा आलीये

Jan 05, 2024, 14:13 PM IST
1/7

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केपटाऊनमधील सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने नवा इतिहास रचला आहे.  

2/7

टीम इंडिया आशिया खंडातील पहिला देश ठरलाय ज्याने केपटाऊमध्ये विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टेस्ट सिरीज दुसऱ्यांदा ड्रॉ करण्यातही भारताला यश मिळालं आहे.  

3/7

केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास रचल्यानंतरही टीम इंडियाच्या पदरी मात्र निराशा आलीये. याचं कारण म्हणजे टीम इंडियाचं आयसीसी टेस्ट क्रमवारीत घसरण झाली आहे.   

4/7

आयसीसीने नकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट सिरीजपूर्वी टीम इंडिया आयसीसीमध्ये टेस्ट क्रमवारीत नंबर-1 वर होती.  

5/7

सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवा झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सिरीज ड्रॉ झाल्यानंतर टीम इंडियाचे रेटिंग पॉईंट्स 118 वरून 117 वर आलेत.   

6/7

तर 118 रेटिंग पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली आहे.  

7/7

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सिरीज ऑस्ट्रेलियाने 2-0 या फरकाने जिंकली. या सिरीजनंतर रँकिंग अपडेट करण्यात आली ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.