IND vs BAN Playing XI: दुबईत 3 फिरकीपटू खेळणार? 'ही' आहे भारत-बांगलादेशचा संभाव्य प्लेइंग 11

IND vs BAN  Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.   

तेजश्री गायकवाड | Feb 20, 2025, 10:51 AM IST

IND vs BAN  Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 

 

1/7

India vs Bangladesh Playing 11 Prediction, IND vs BAN Head To Head Records: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. आता आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियामध्ये समाविष्ट होऊ शकतील असते सर्व 15 खेळाडू मॅच विनर आहेत.

2/7

ऋषभ पंतच्या दुखापतीने संघाला मोठा धक्का

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप करताना टीम इंडियाचे ११ खेळाडू जवळपास निश्चित झाले आहेत, पण ऋषभ पंतच्या दुखापतीने संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, क्रिकेट तज्ज्ञांच्या मते केएल राहुल हा ऋषभ पंतपेक्षा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये यष्टिरक्षक म्हणून अधिक फिट आहे.

3/7

सामने दुबईत होणार

भारतीय संघाला आपले सर्व सामने दुबईत खेळायचे आहेत. अशा स्थितीत प्लेइंग-11 मध्ये तीन फिरकीपटू ठेवायचे की तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश करायचा, हा विचार करण्याचा विषय ठरेल.

4/7

भारताचे संभाव्य ११ खेळाडू (Playing 11 of India)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव.  

5/7

बांगलादेशचे संभाव्य ११ खेळाडू (Playing 11 of Bangladesh)

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तनजी हसन, तौहीद हृदय/झाकीर अली अनिक, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, तन्झीम हसन साकीब/नाहीद राणा.

6/7

सामन्याची वेळ काय आहे?

चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश ( IND Vs BAN)  सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. 

7/7

सामना टीव्हीवर लाईव्ह कुठे बघाता येईल?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल.  स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण करेल.