जयस्वालने सांगितलं 'यशस्वी' Double Century चं रहस्य! मुंबईकर हे वाचून म्हणतील, 'एकदम खरं बोललास मित्रा'

Yashasvi Jaiswal Double Century Success Secret: तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही... या अशा मोजक्या शब्दांमध्ये यशस्वी जयसवालच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगता येईल. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये स्वप्नवत डेब्यू करणाऱ्या या मुंबईकर तरुणाच्या यशाचा गुरुमंत्र त्याने आपल्या 2 द्विशतकांनंतर सांगितला. जयसवालने आपल्या यशाचं गुपित सांगताना त्यामागील मुंबई कनेक्शनचं अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. तो काय म्हणालाय पाहूयात...

| Feb 21, 2024, 15:22 PM IST
1/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

भारताचा तरुण फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरीमुळे चर्चेत आहे. जयसवालने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केलेली.  

2/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

आतापर्यंतच्या आपल्या 7 कसोटी सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये यशस्वी जयस्वालने शतकं झळकावली आहेत. या तिन्ही वेळेस त्याने 150+ हून अधिक धावा केल्या आहेत. यात 2 दुहेरी शतकांचाही समावेश आहे.  

3/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमधील तिन्ही सामन्यांमध्ये उत्तम फलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये त्याचं शतक हुकलं. मात्र पुढल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 2 शतकं झळकावली.  

4/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

यशस्वी जयसवालच्या या तुफानी खेळींनंतर त्याची तुलना थेट विरेंद्र सेहवाग आणि विनोद कांबळींसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर केली जात आहे.   

5/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

यशस्वी जयसवाल भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या मालिकेमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत.  

6/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

भारत-विरुद्ध इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वालनंतर थेट इंग्लंडच्या बेन डकेटचा क्रमांक लागतो. मात्र या दोघांच्या धावांमध्ये 257 धावांचं अंतर आहे.

7/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जयसवालने 22 षटकार लगावले आहेत. हा सुद्धा एक विक्रमच आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या दोघांना प्रत्येकी 4 षटकार लगावता आलेत.

8/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक नाइटही यशस्वीच्या या खेळीने प्रभावित झाला आहे. यशस्वीने दाखवलेली फलंदाजीमधील परिक्वता पाहून निक नाइटने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत त्याला एक रंजक प्रश्न विचारला. त्यावर यशस्वीनेही फारच भन्नाट उत्तर दिलं. 

9/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

23 वर्षांचा असूनही तू ज्या पद्धतीच्या मोठ्या खेळी करण्याबद्दल बोलतो आणि त्यानंतर तसा खेळही करतो. हे सारं पाहून असं वाटतं की 32 वर्षांच्या खेळाडूबरोबर मी बोलतोय. तुझ्यामध्ये एवढा समजूतदारपणा कुठून आला? असा प्रश्न निक नाइटने यशस्वी जयसवालला विचारला. 

10/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

निक नाइट या प्रश्नाला उत्तर देताना यशस्वीने, भारतात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. तुम्हाला जी संधी मिळते त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला घेता यायला हवा, असं सांगितलं.

11/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

क्रिकेटसाठी मुंबईत राहून जीवाचं रान करणाऱ्या यशस्वी जयस्वालने या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईतील लाईफ स्टाइलचं उदाहरण अप्रत्यक्षपणे दिले.

12/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

"तुम्हाला असं दिसून येईल की जेव्हा तुम्ही भारतात लहानाचे मोठे होता तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला झगडावं लागतं. तुम्हाला साधी बस पकडायची असेल तरी पूर्ण जोर लावावा लागतो. तुम्हाला ट्रेन किंवा रिक्षा पकडायची असेल तरी हेच करावं लागतं. मी माझ्या लहानपणापासून हेच करत आलो आहे," असं यशस्वी जयसवाल म्हणाला.

13/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं असं सांगितल्यानंतर यशस्वी जयसवालने, "प्रत्येक संधी किती महत्त्वाची आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळेच मी प्रत्येक डाव आणि सरावादरम्यान फार मेहनत घेतो," असं म्हटलं.  

14/14

IND vs ENG Test Yashasvi Jaiswal Double Century Success Secret

"मला मिळणारी प्रत्येक संधी माझ्याबरोबरच संघासाठीही महत्त्वाची वाटते. देशासाठी खेळणं हे माझ्यासाठी फारच प्रेरणादायक आहे. त्यामुळेच मी जेव्हा खेळतो तेव्हा 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मला हे असं खेळणं फार आवडतं," असंही जयसवालने सांगितलं.