IND vs ENG: आर अश्विनने एकाच वेळी मोडला कुंबळे आणि कपिल देव यांचा रेकॉर्ड!

Ravichandran Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने रांची कसोटीत इतिहास रचला. भारताचे माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेंना मागे टाकत त्याने एक मोठा विक्रम केला आहे. 

Feb 25, 2024, 14:22 PM IST
1/7

Offspinner Ravichandran Ashwin

भारतीय संघाचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपला देशबांधव आणि माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला आहे.

2/7

R Ashwin

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हा इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेट आणि ऑली पोप यांना दोन चेंडूत बाद करताच त्याने भारतात कसोटी खेळताना 350 बळी पूर्ण केले.

3/7

test cricket record

त्यामुळे आर अश्विन हा भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही खेळाडूने त्यांच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतलेले नाहीत.

4/7

anil kumble

अनिल कुंबळे यांनी भारतात खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीत 115 कसोटी सामने खेळून एकूण 350 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी हरभजन सिंगने भारतात आपल्या कारकिर्दीत 265 विकेट्स घेतल्या होत्या.

5/7

kapil dev

याशिवाय भारताचे माजी कर्णधाल कपिल देव यांनीही भारतात कसोटी खेळताना एकूण 219 विकेट्स आपल्या नावावर करण्यात यश मिळवले होते. मात्र आता अश्विनने सर्वांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

6/7

Ravichandran Ashwin record

पहिल्या डावात अश्विनने एकच विकेट घेतली होती. मात्र इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्विनने सलग दोन चेंडूत 2 बळी घेत भारताच्या एकूण 351 बळी घेण्याचा इतिहास केला. आता अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

7/7

Muralidharan

तसं पाहायला गेलं तर आपल्या देशात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने श्रीलंकेत कसोटी खेळताना एकूण 493 विकेट घेतल्या होत्या. (सर्व फोटो - AP)