स्वातंत्र्यदिन विशेष: लहान मुलांना आवडतील असे खेळ आणि स्पर्धा

| Aug 14, 2024, 13:48 PM IST
1/9

स्वातंत्र्यदिन विशेष: लहान मुलांना आवडतील असे खेळ आणि स्पर्धा

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

Independence Day Activities For Kids: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा दिवस. हा दिवस तुम्ही तुमच्या घरातील, सोसायटीतील लहानग्यांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा करु शकता. विविध खेळ आणि स्पर्धा घेऊन हा दिवस संस्मरणीय करु शकता. 

2/9

झेंडा वंदन

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

लहान मुलांना त्यांच्या शाळेत किंवा सोसायटीमध्ये झेंडा वंदनाला घेऊन जा. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा त्यांच्याकडून पाठ करुन घ्या. 

3/9

चित्रकला स्पर्धा

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

स्वातंत्र्यदिनी चित्र काढणे, चित्र रंगवणे अशा स्पर्धा असतात. तुमच्या मुलांना त्यात सहभागी होऊ द्या.  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तुम्ही सोसायटीत अशा स्पर्धा आयोजित करु शकता. 

4/9

देशभक्तीपर पथनाट्य, नाटक

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

स्वातंत्र्यदिन अधिक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मुलांकडून पथनाट्य किंवा छोट्याशा नाटकाचा सराव करुन घ्या. देशभक्तीपर गाणी आणि प्रसंगांचा त्यात समावेश असू द्या.

5/9

देशभक्तीपर गाणी

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

देशभक्तीपर गाणी  पेपरवर देशभक्तीपर गाणी लिहून तुमच्या मुलांना वैयक्तिक अथवा ग्रुपने बोलू द्या. त्या गाण्याचा अर्थ त्यांना समजावून सांगा.

6/9

सांस्कृतिक नृत्य

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

मुलांना महात्मा गांधी, सुभाषचंद्र भोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, चंद्रशेखर आझाद अशा तमाम स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशात यायला सांगा. 

7/9

क्वीज कॉम्पिटिशन

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

मुलांसोबत एकत्र मिळून देशभक्तीपर सिनेमा पाहा. गाणी ऐका. बॉर्डर, द लेजंड ऑफ भगतसिंग, रंग दे बसंती, लगान आणि मंगल पांडे हे सिनेमा मुलांना दाखवा. त्यांना विविध प्रश्न विचारा. 

8/9

टी शर्ट पेंटींग

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

लहान मुलांना स्वातंत्र्यदिनाची थीम देऊन टी शर्ट पेंटींग करायला सांगा. सफेद शर्टवर तिरंगी रंग फार शोभून दिसतील. मुलांनादेखील हे आवडेल. 

9/9

धान्याने तिरंगा बनवा

Independence Day Intresting and Fun Loving Activities for kids 15 August Special Marathi News

घरातील कडधान्यांचा उपयोग करुन तिरंगा बनवायला शिकवा. सफेद पेपर, ग्लू आणि पांढरे तांदूळ, केशरी, हिरव्या डाळ घेऊन मुलांकडून तिरंगा बनवून घ्या.