Sarkari Naukri: भारतीय कृषी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

| Jul 12, 2023, 11:51 AM IST
1/8

भारतीय कृषी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

AIC of India Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना पगाराची चांगली रक्कम मिळणार आहे. त्यामुळे पदवीधर असाल तर या बातमीकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

2/8

मॅनेजमेंट ट्रेनी

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीचे पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ग्रॅज्युएशनमध्ये 60% असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना 55 टक्के असणे आवश्यक आहे. 

3/8

वयोमर्यादा

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जून 2023 रोजी 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

4/8

परीक्षा शुल्क

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 1000रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

5/8

पगार

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 60 रुपये वेतन दिले जाणार आहे. संपूर्ण भारतात ही भरती केली जाणार आहे. 

6/8

मुलाखत

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगच्या आधारावर केली जाईल ज्यासाठी एकूण 200 गुण असतील.

7/8

जुलै/ऑगस्टमध्ये परीक्षा

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

महाराष्ट्रात पुणे,मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर/नागपूर येथे परीक्षा केंद्र असणार आहेत. यासंदर्भातील परीक्षा जुलै/ऑगस्ट 2023 दरम्यान होणारआहे.

8/8

अर्जाची शेवटची तारीख

India Job For Graduate in Indian Agricultural Insurance Company Employment News in Marathi

यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातूनअर्ज मागविण्यात येत असून 16 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.