India Last Railway Station: भारतामधील शेवटचे स्टेशन, जिथून दिसतो दुसरा देशाचा नजा

रेल्वेमधून दररोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. देशातील काही जुनी रेल्वे स्थानके यामध्ये आहेत. आज देशातील शेवटच्या रेल्वे स्थानकांबद्दल जाणून घेऊयात. 

| Dec 05, 2024, 20:07 PM IST
1/7

सिंहाबाद

भारतातील शेवटच्या रेल्वे स्टेशनचे नाव सिंहाबाद आहे.  हे स्टेशन बांगलादेशाच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. येथे रेल्वेचा वापर माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. 

2/7

बांगलादेशची सीमा

सिंगाबाद हे पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात येते. या ठिकाणाहून तुम्हाला बांगलादेशची सीमा बघायला मिळेल. 

3/7

शेवटचे रेल्वे स्टेशन

या रेल्वे स्टेशनवर लोक पायी चालत जाऊ शकतात. सिंगाबादच्या पलीकडे भारतीय रेल्वेचे कोणतेही स्थानक नाही. हे स्टेशन जुने असल्यामुळे येथे लोक कमी दिसतात. येथून मालगाड्या जास्त धावतात. 

4/7

मालगाड्यांची वाहतूक

हे रेल्वे स्टेशन भारतात ब्रिटीशांच्या काळात असताना बांधण्यात आले होते. हे स्टेशन बराच काळ निर्मनुष्य राहिले. 1978 मध्ये येथून मालगाड्यांची वाहतूक सुरू झाली. त्याकाळात त्या स्टेशनवरून बांगलादेशात मालगाड्या जात होत्या. 

5/7

रेल्वे स्थानकात बदल नाही

या रेल्वे स्थानकात आतापर्यंत कोणताही बदल झालेला नाहीये. 2011 मध्ये बांगलादेश व्यतिरिक्त नेपाळचाही या मार्गात समावेश करण्यात आला होता.   

6/7

रोहनपूर

आता या रेल्वे स्थानकावरून बांगलादेश आणि नेपाळमध्ये ट्रेन जातात. सिंगाबाद हे शेवटचे रेल्वे स्थानक असताना, बांगलादेशातील पहिले स्थानक रोहनपूर या मार्गावर येते. 

7/7

तिकीट काउंटर

या रेल्वे स्टेशनवर ब्रिटीशकालीन दळणवळणाचे संकेत आणि इतर उपकरणे ठेवण्यात आली आहेत. या स्थानकावर तिकीट काउंटर नाहीये.