भारतातील 'या' सात Youtubers ची कोट्यवधीत कमाई, संपत्ती ऐकून थक्क व्हाल

YouTuber : सध्याच्या काळात यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे युजर्स आपली प्रतीभा दाखवत लाखो-करोडो रुपये कमवत आहेत. भारतातही असे अनेक यूटूयूबर्स आहेत ज्यांनी आपल्या मेहनत आणि कंटेटच्या जोरावर भरपूर प्रसिद्धी आणि पैसे कमावले आहेत. भारतात आता यूट्यूब  केवळ मनोरंजनाचं नाही तर कमाईचं साधनही बनलं आहे. अनेक तरुणांनी यूट्यूबवर कमाईचा मार्ग निवडला आहे. व्लॉग, टेक रिव्ह्यू, कॉमेडी, शिक्षण, गेमिंग अशा विविध माध्यमातून यूट्यूबर्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात सध्या टॉपवर असलेल्या यूट्यूबर्स कोण आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.   

| Oct 02, 2024, 19:07 PM IST
1/7

1. गौरव चौधरी (Technical Guruji )

भारतात टॉप यूट्यबर्समध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे गौरव चौधरी. यूट्यूबवर गौरव टेक्निकल गुरुजी म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. तो यूट्यूबवर लेटेस्ट गॅजेट्स, स्मार्टफोन, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती देतो. त्याची सांगण्याची पद्धत आणि अनुभवामुळे त्याच्या व्हिडिओला करोडो व्ह्यूज मिळतात. गौरव चौधरीची एकूण संपत्ती जवळपास 360 कोटी रुपये आहे, जी त्याने यूट्यूबच्या माध्यमातून कमावली आहे. 

2/7

2. भुवन बाम (BB Ki Vines)

भारतातल्या टॉप यूट्यबर्समध्ये दुसऱ्या स्थानावर आहे BB KI Vines नावाने प्रसिद्ध असलेला भूवम बाम. भूवम बामच्या चॅनेलवर जवळपास 26.4 मिलिअन्स सब्सक्राईबर आहेत. त्याचे व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. भूवमची एकूण संपती जवळपास 122 कोटी रुपये आहे.

3/7

3. संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari)

संदीप माहेश्वरी हे एक मोटिवेशनल स्पीकर आणि यूट्यबर्स आहेत. संदीप आपल्या व्हिडिओमधून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्याचे कानमंत्र देतात. त्यांच्या व्हिडिओला लाखोने व्ह्यूज मिळतात. यूट्यब चॅनेलवर त्यांचे 28.5 कोटी सब्सक्राईबर आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 41 कोटी इतकी आहे.

4/7

4. अजेय नागर (Carryminati)

यूट्यबर कॅरीमिनाटी नावाने लोकप्रिय असलेला अजय नागरचा 'अभी तो रुको' हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला आहे. अजेय आपल्या चॅनेलवर रोस्ट व्हिडिओ आणि गेमिंग कंटेट शेअर करतो. अजयच्या यूट्यब चॅनेलवर जवळपास 43.2 मिलिअन सब्सक्राईबर आहेत. त्याची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे.

5/7

5. मिस्टर इंडियन हॅकर (Mr. Indian Hacker)

मिस्टर इंडियन हॅडक हा एक प्रसिद्ध यूट्यबर आहे. आपल्या चॅनेलवर तो नवनवे प्रयोग आणि विज्ञानाशी संबंधीत व्हिडिओ शेअर करतो. त्याच्या चॅनेलवर 42.3 मिलिअनपेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत. त्याची संपत्ती जवळपास 16 कोटी रुपये आहे.

6/7

6. आशीष चंचलानी (Ashish Chanchlani Vines)

यूट्यबरवर कामेड आणि मजेदार व्हिडिओ बनवत आशीच चंचलानी हा तरुण प्रचंड व्हायरल झाला. आशीष चंचलानी वाइन्स या नावाने यूट्यूबवर त्याचं चॅनेल आहे. अनेक सेलिब्रेटीही आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आशिषच्या चॅनेलवर येत असतात. त्याची संपत्ती जवळपास 41 कोटी रुपये इतकी आहे.   

7/7

7. अमित भडाना (Amit Bhadana)

अमित भडाना हा यूट्यबरवरचा एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यबर आहे. आपल्या देसी भाषेत विनोदी व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे 24.5 मिलिअन सब्सक्राईबर आहेत आणि भारतातल्या मोठ्या यूट्यूबरमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. त्याची एकूण संपत्ती जवळपास 58 कोटी रुपये इतकी आहे.