भारतात लॅण्ड होताच डेव्हिड वॉर्नरचा जवानाबरोबर Selfie; कॅप्शन पाहून चाहते Clean Bold

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा आणि या सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या एका पोस्टने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूयात वॉर्नरने नेमकं काय म्हटलं आहे आणि त्यावर भारतीयांनी काय प्रतिक्रिया नोंदवल्यात...

| Sep 21, 2023, 10:48 AM IST
1/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

क्रिकेट हा भारतीयांचा जीव की प्राण आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. भारतीयांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम हे देशांच्या सीमांपल्याडचंही आहे. त्यामुळेच अनेक परदेशी खेळाडूही भारतात प्रचंड लोकप्रिय असून अशा खेळाडूंची यादी काढली तर ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरच नाव पहिल्या स्थानी येईल यात शंका नाही.

2/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

डेव्हिड वॉर्नर हा दिल्ली डेअरडेव्हल्सच्या संघाकडून इंडियन प्रमिअर लिगमध्ये खेळतो. त्यामुळे त्याचं भारतात वरचे वर येणं जाणं असतं.

3/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

मात्र डेव्हिड वॉर्नरचं भारत प्रेम हे फार हटके आहे. त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तरी याचा अंदाज तुम्हाला येईल. 

4/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

कधी डेव्हिड वॉर्नर भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकतो.

5/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

तर कधी भारतीय फिल्मी कनेक्शनशी संबंधित फोटो डेव्हिड वॉर्नर इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असतो. हा वरचा फोटो त्यानेच शेअर केला आहे.

6/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

काही दिवसांपूर्वी डेव्हिड वॉर्नरने भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर शुभेच्छा देणारी पोस्टही इन्स्टाग्रामवर केली होती.

7/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

बरं आपलं हे भारत प्रेम दाखवण्यापासून डेव्हिड वॉर्नर लाजत नाही. मागच्या वर्षी त्याने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारी पोस्टही केली होती.

8/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

तर आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरने आपला देसी लूकमधील हा एडीटेड फोटोही पोस्ट केला होता.

9/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

असा केवळ एकच फोटो डेव्हिड वॉर्नर पोस्ट केलेला नाही. अगदी भारतीय पारंपारिक पेरहाव असलेल्या कुर्त्यामधील स्वत:चा हा फोटोही त्यानेच पोस्ट केला आहे.

10/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

बरं केवळ एडीटेड फोटो नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये भारतासंदर्भातील काही घडामोड असेल तर डेव्हिड वॉर्नर आवर्जून पोस्ट करतो. ही वर दिसणारी पोस्ट त्याचेच एक उदाहरण...

11/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

भारत दौऱ्यावर आल्यावर डेव्हिड वॉर्नर अनेक पर्यटन स्थळांना भेटी देत असतो. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत भटकंती करतो हे विशेष

12/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

केवळ गणेश चतुर्थीसारख्या सणांच्या शुभेच्छाच डेव्हिड वॉर्नर देतो असं नाही तर तो रंगपंचमीसारखे भारतीय उत्सवही डेव्हिड वॉर्नर साजरे करतो.

13/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

मध्यंतरी एकदा मुंबई असताना डेव्हिड वॉर्नरने एकदा त्याच्या कारच्या बाजूला असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीतील ड्रायव्हरबरोबरचा सेल्फी शेअर केला होता.

14/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

याच डेव्हिड वॉर्नरने आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी भारतात आल्यानंतर एका जवानाबरोबरच सेल्फी विमानतळावरुनच शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

15/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

"भारतात पुन्हा पुन्हा होणारं स्वागत हे भारावून टाकणारं आहे. आमची कायमच इथे काळजी घेतली जाते आणि सुरक्षित वाटतं. दिल्ली विमानतळावरुन नेहमीच आमचा प्रवेश सुखकर करुन दिला जातो त्यासाठी धन्यवाद," असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे. त्याने #India आणि #Love हे हॅशटॅगही वापरले आहेत. विशेष म्हणजे ज्या जवानाबरोबर वॉर्नरने फोटो काढला त्याने या पोस्टवर कमेंट करत, "सेल्फीसाठी धन्यवाद सर," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. अनेक चाहत्यांनी वॉर्नरचं भारतात स्वागत केलं आहे.

16/16

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie With Security Personnel

या फोटोवर भारतीयांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी भारत हे तुझं दुसरं घर आहे असं वॉर्नरला सांगितलं आहे तर काहींनी त्याचं स्वागत 'भारतात स्वागत आहे डेव्हिड भाई' असं म्हणत केलं आहे. एकाने तर निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरने 6 महिने ऑस्ट्रेलियात आणि 6 महिने भारतात रहावं असा सल्ला दिला आहे. यावरुन डेव्हिड वॉर्नरबद्दल भारतीयांना वाटणारं प्रेम दिसून येत आहे.