कर्णधार म्हणून केएल राहुलचा रेकॉर्ड कसा? पहिल्याच मालिकेत भारताने सगळे सामने गमावले पण...

India vs Australia KL Rahul Captaincy Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून सुरु होत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये नेतृत्वाची धूरा के. एल. राहुलच्या हाती आहे. 9 महिन्यानंतर के. एल. राहुल देशाचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या 2 सामन्यासाठी भारताचा संघ वेगळा असून शेवटच्या सामन्यात भारताचा वेगळाच संघ खेळणार आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या के. एल. राहुलने यापूर्वीही भारताचं नेतृत्व केलं आहे. त्याचा रेकॉर्ड कसा आहे पाहूयात...

| Sep 22, 2023, 10:13 AM IST
1/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.

2/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचं नेतृत्व के. एल. राहुल करणार आहे.

3/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

के. एल. राहुलने आशिया चषकामधून दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे आता तो नेतृत्व कसं करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून तो 9 महिन्यांनंतर ही जबाबदारी पुन्हा एकदा खांद्यावर घेतोय.

4/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

के. एल. राहुलने आतापर्यंत 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. 

5/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्व के. एल. राहुलने केलं होतं.  

6/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तिन्ही सामने भारताने गमावले होते. त्यावेळी के. एल. राहुलच्या नेतृत्वावर टीका झालेली.

7/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये के. एल. राहुलने नेतृत्व केलेलं. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकलेली.

8/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये के. एल. राहुलने बंगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात भारताचं नेतृत्व केलेलं. भारताने के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध खेळलेला सामना जिंकला होता.  

9/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

के. एल. राहुल कर्णधार असताना खेळवण्यात आलेल्या सर्व सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास 7 सामन्यांपैकी 3 सामने भारताने गमावले आहेत तर 4 सामने जिंकले आहे. 

10/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

म्हणजेच कर्णधार म्हणून के. एल. राहुलची विजयाची सरासरी 50 टक्क्यांहून अधिक आहे. 

11/11

India vs Australia KL Rahul Captaincy Record

के. एल. राहुलने आतापर्यंत तुलनेनं दुबळ्या संघांविरोधातच दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.