India VS South Africa : विराट इतिहास घडवणार? 'या' 5 रेकॉर्ड्सवर सर्वांचे लक्ष

 विराट कोहलीही विश्वविक्रम करू शकतो, तर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनलाही ५०० च्या स्पेशल क्लबमध्ये सामील होण्याची संधी मिळू शक्ते.

Dec 26, 2023, 13:09 PM IST

 विराट कोहलीही विश्वविक्रम करू शकतो, तर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनलाही ५०० च्या स्पेशल क्लबमध्ये सामील होण्याची संधी मिळू शक्ते.

 

1/7

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 2 कसोटी सामन्यात भारतीय खेळाडू 5 मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका जिंकून इतिहास रचू शकतो.   

2/7

या मालिकेत विराट कोहलीही विश्वविक्रम करू शकतो, तर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनलाही ५०० च्या स्पेशल क्लबमध्ये सामील होण्याची संधी मिळू शक्ते.  

3/7

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर या मालिकेद्वारे पुनरागमन करत आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनू शकतो. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेत 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत ज्यात त्यांना 7 पराभव पत्करावा लागला आहे तर एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली आहे.   

4/7

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा 2 षटकार मारून एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडणार आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने आतापर्यंत 88 कसोटी डावांमध्ये 77 षटकार मारले आहेत. धोनीच्या नावावर 78 षटकार आहेत. अनुभवी क्रिकेटपटू धोनीला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित दुसरा भारतीय ठरणार आहे. या यादीत अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ९१ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

5/7

वनडे विश्वचषक २०२३ नंतर पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल द्रविड १२५२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नावावर १२३६ धावा आहेत आणि १७ धावा होताच तो राहुल द्रविडला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.  

6/7

विराट कोहलीने एका वर्षात 6 वेळा 2000 धावांचा आकडा गाठला आणि 2000 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकारासोबत पहिल्या स्थानावर आहे. कोहली आणि संगकारा यांनी प्रत्येकी 6 वेळा हा आकडा स्पर्श केला आहे. दक्षिण आफ्रिकेत 66 धावा केल्यानंतर विराट 7व्यांदा कॅलेंडर वर्षात 2000 धावा पूर्ण करेल. यावेळी तो कुमार संगकाराला मागे टाकून विश्वविक्रम करेल.  

7/7

ऑफस्पिनर आर अश्विनकडे कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 11 विकेट घेतल्याबरोबरच तो कसोटीत 500 चा जादुई आकडा गाठेल. अश्विनला ही कामगिरी करण्यात यश आल्यास, अनिल कुंबळेनंतर कसोटीत ५०० बळी घेणारा तो दुसरा भारतीय ठरेल. कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट आहेत.