'बॅट्समनला हवं ते बोला, दंड होऊ दे, अंपायर्सला बघून घेऊ'; रोहितने टीम इंडियाला असा सल्ला दिला तेव्हा...

Rohit Sharma Revealed Biggest Secret T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानात नेमकं काय सुरु होतं याबद्दलचा रंजक खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केलाय. तो काय म्हणालाय जाणून घ्या...

| Oct 08, 2024, 13:05 PM IST
1/12

teamindia2024

रोहित शर्माने धक्कादायक खुलासा करताना मैदानात नेमकं काय घडलं याबद्दल सांगितलं. त्याने नक्की काय खुलासा केला आहे जाणून घेऊयात...

2/12

teamindia2024

भारताने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप जिंकत 17 वर्षांपासूनच टी-20 वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवला. मात्र अंतिम सामन्यात प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या क्षणांदरम्यान मैदानात काय सुरु होतं यामागील सत्य आता समोर आलं आहे. 

3/12

teamindia2024

जून महिन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये रोमहर्षक क्षणी मैदानात भारतीय खेळाडूंमध्ये काय चर्चा सुरु होती याबद्दलचा खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केला आहे.

4/12

teamindia2024

बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. हाती 6 विकेट्स असल्याने दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकणार असं मानलं जात होतं.   

5/12

teamindia2024

मात्र हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराह आणि हर्षदीप सिंग यांनी सामना फिरवला. सामना फिरला तो हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करत असलेल्या हेन्रीक कार्लसनची विकेट घेतल्यानंतर!  

6/12

teamindia2024

यानंतर मैदानात काय घडलं याबद्दल रोहित शर्मानेच, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सांगितलं. "हार्दिकने कार्लसनला बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावात आला. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो आणि फलंदाजींची स्लेजिंग करु लागलो. मात्र त्याचा तपशील मी तुम्हाला इथं देऊ शकत नाही," असं रोहित म्हणताच कपील शर्मासहीत सर्वजण हसू लागले. रोहितने, "आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं होतं म्हणून हे करणं भाग होतं," असंही म्हटलं.  

7/12

teamindia2024

"हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला आमच्या वर्तवणुकीसाठी दंड झाला असता तरी चाललं असतं, अशा भूमिकेत त्यावेळी आम्ही होतो," असं रोहित यावेळेस म्हणाला.  

8/12

teamindia2024

तसेच पुढे बोलताना, "त्यामुळेच मी सर्वांना म्हणालो की तुम्हाला वाटेल ते बोला. आपण पंचांना नंतर बघून घेऊ," असा सल्ला खेळाडूंना दिलेला असं रोहितने कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं.   

9/12

teamindia2024

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर कार्ल्सनची विकेट गेल्याने दक्षिण आफ्रिकेची पडझड सुरु झाली असली तरी सामन्याचा वेग कमी करण्याचं क्रेडिट रोहित शर्माने ऋषभ पंतला दिलं आहे.   

10/12

teamindia2024

"त्याच्याकडे बऱ्याच विकेट्स बाकी होत्या. आम्ही सर्वजण टेन्शनमध्ये होतो. मात्र कर्णधार असल्याने हे टेन्शन चेहऱ्यावर दाखवून चालणार नव्हतं. मात्र कोणालाच ठाऊक नाही की सामन्यादरम्यान एक छोटा ब्रेक झाला. (दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 24 बॉलमध्ये 26 धावा हव्या असताना.) ऋषभ पंतने डोकं वापरलं आणि सामाना थांबवला. माझा पाय दुखावला असून मला गुडघ्याला फिजिओकडून टेप लावून घ्यायची आहे असं म्हणत पंतने ब्रेक घेतला," असं रोहितने सांगितलं.  

11/12

teamindia2024

"पटापट गोलंदाजी केली जावी असं त्यावेळी फलंदाजांना वाटत होतं कारण त्यांना लय गवसली होती. मात्र आम्हाला हा धावांचा वेग संथ करायचा होता. मी फिल्डींग लावत होतो. गोलंदाजाशी बोलत होतो आणि अचानक मी पंतला मैदानावर पडलेलं पाहिलं. तिथे फिजिओ आला आणि कार्ल्सन सामाना सुरु होण्याची वाट पाहत होता," असं रोहित म्हणाला.

12/12

teamindia2024

"यामुळे सामना जिंकलो असं मी थेट म्हणणार नाही. मात्र हे नक्कीच कारण असू शकतं. पंतने त्याचं डोकं वापरलं," असं रोहित म्हणाला.