Indian Railway : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 7 ते 12 एप्रिलदरम्यान 'या' मार्गावरील गाड्या रद्द

टाटानगर रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या कोटशिला जंक्शन येथे आदिवासी कुर्मी समाजाचे आंदोलन आणि खेमसुली रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे हावडा मार्गे ये- जा करणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.   

Apr 10, 2023, 08:12 AM IST

Indian Railway : भारतीय रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. ज्यामुळं आता प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

1/7

train chart

indian railway Express trains on Howrah route cancelled

काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेशन, शॉर्ट ओरिजिनेटेड, तर काही वळवण्यात आल्या आहेत. 7 ते 12 एप्रिल दरम्यान हावडा मार्गे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. 

2/7

cancelled trains

indian railway Express trains on Howrah route cancelled

हावडा-मुंबई, हावडा- पुणे, हावडा- चेन्नई, हावडा-अहमदाबाद मेल, एक्स्प्रेस, गितांजली, समरसता अशा विविध गाड्या 7 एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

3/7

indian railway cancelled trains

indian railway Express trains on Howrah route cancelled

गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांनी आखलेले नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळाची प्रचंड हानी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे. 

4/7

indian railway scedule

indian railway Express trains on Howrah route cancelled

रेल्वे रुळाचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी किमान पाच दिवस लागणार आहे. त्यामुळे 12 एप्रिलपर्यंत हावडाहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.   

5/7

indian railway time table

indian railway Express trains on Howrah route cancelled

कोटशिला जंक्शन आणि खेमसुली रेल्वे स्थानक आंदोलकांनी लक्ष्य केले होते. 

6/7

indian railway trains

indian railway Express trains on Howrah route cancelled

सदर परिसरातील ट्रॅक उखडून टाकले आहे. रुळाला प्रचंड क्षती पोहोचली असून, दुरुस्तीचे कार्य युद्धस्तरावर प्रारंभ झाल्याची माहिती आहे. 

7/7

indian railway

indian railway Express trains on Howrah route cancelled

एकंदर परिस्थिती पाहता आता गोंदिया स्थानकावर पैसे रिटर्न घेण्यासाठी प्रवासानी गर्दी केली आहे.