विनाकारण ट्रेनची साखळी ओढल्यास काय होते शिक्षा? ऐकूनच कोणाची नाही होणार हिम्मत!

आपत्कालीनवेळी गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा! अशी ओळ या साखळीजवळ लिहिलेली असते.

| Oct 25, 2024, 09:19 AM IST

Indian Railway Pulling chain Rules: आपत्कालीनवेळी गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा! अशी ओळ या साखळीजवळ लिहिलेली असते.

1/8

साखळी ओढल्यावर का थांबते ट्रेन? इतकं सोपं मग प्रवासी मध्येच का नाही उतरत? खरं कारण आलं समोर

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

Indian Railway Pulling chain Rules: भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान कोणत्याही सीटच्यावर तुम्ही एक साखळी पाहिली असेल. पूर्वी ही साखळी प्रत्येक केबिनमध्ये दिसायची पण आता ती फक्त काही केबिनमध्येच दिसते. आपत्कालिनवेळी गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा! अशी ओळ या साखळीजवळ लिहिलेली असते.

2/8

परिणाम लोकांना भोगावे लागतात.

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

तुम्ही चित्रपटामधील सीन्समध्ये ही साखळी ओढताना पाहिलं असेल. ही साखळी खेचल्यावर ट्रेन थांबते, असं तुम्ही पुढे पाहिलं असेल. असं असलं तरी फक्त गंमत म्हणून साखळी ओढता कामा नये. कारण नंतर त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागतात. 

3/8

त्या साखळीत असे काय असते?

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

त्या साखळीत असे काय असते की ती खेचल्याने ट्रेन थांबते? प्रवाशांना ही सुविधा असेल तर ते कुठेही साखळी ओढून ट्रेनमधून का उतरत नाहीत? सामान्य लोक त्यांचे प्रश्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora (GK Quiz) वर विचारतात. त्या क्षेत्रातील तज्ञ त्यांना वाटल्यास उत्तर देऊ शकतात. असे असले तरी अनेकवेळा सामान्य लोक देखील उत्तर देतात.

4/8

आपापल्या परीने उत्तर

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

काही वर्षांपूर्वी Quora वर कोणीतरी याबद्दल प्रश्न विचारला होता. साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते? हा प्रश्न ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या मनात नक्कीच आला असेल. यावर अनेकांनी आपापल्या परीने उत्तर दिले आहे.

5/8

साखळी ओढून ट्रेन कशी थांबते?

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

द हिंदू वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ट्रेनच्या डब्यात लावलेली चेन ट्रेनच्या मुख्य ब्रेक पाईपला जोडलेली असते. या पाईपमध्ये पूर्ण दाब राखला जातो. साखळी ओढताच ब्रेक एअर पाईपमधील व्हॉल्व्ह उघडतो आणि हवा सोडली जाते. त्यामुळे ब्रेकमधील हवेचा दाब कमी होऊ लागतो आणि त्यामुळे ट्रेनचा वेग कमी होतो.

6/8

ट्रेन कुठेही थांबल्यानंतर प्रवासी का उतरत नाहीत?

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

ही सुविधा प्रवाशांना सहजतेने उपलब्ध आहे. असे असताना मग आपल्या घराजवळ किंवा मध्येच मनाला वाटेल तेव्हा प्रवासी साखळी खेचून ट्रेन का थांबवत नाहीत?  कोणी साखळी मध्येच का उतरत नाही? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. असे प्रकार वर्षानुवर्षे प्रवाशांकडून केला जात आहेत. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण होतो. साखळी ओढण्याची यंत्रणा केवळ आपत्कालीन परिस्थितीतच दिली जाते.

7/8

साखळी ओढण्याचा पर्याय

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

ट्रेनमध्ये आग लागल्यावर, कोणत्याही प्रवाशाला आरोग्यासंबंधी त्रास होत आल्यास  ट्रेनमध्ये कोणती गुन्हेगारी घटना घडत घडल्यास, ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना कोणतीही दुर्घटना घडल्यास ही साखळी ओढण्याचा पर्याय असतो.

8/8

1 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड

Indian Railway why train stop by pulling chain Marathi News

या सर्व परिस्थितींशिवाय जर कोणी फक्त साखळी ओढून खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार त्या व्यक्तीला 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. एवढेच नव्हे तर त्यासोबत त्या व्यक्तीला 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ एकत्र शकतात.