एआर रहमान कधीच आपल्या वडिलांबद्दल का बोलत नाही? त्यांचा विचार करुनच थरथरतं त्याचं अंग, म्हणतो 'इतका वेदनादायक....'

AR Rahman Never Miss His Father: आपल्या दमदार संगीत आणि गाण्यांमुळे एआर रहमानला संपूर्ण जगभरात ओळखलं जातं. एआर रहमानने ऑस्करही जिंकला असल्याने त्याला संपूर्ण जगभरात मानाचं स्थान आहे. तो कधीकधी आपली आई, कुटुंबाबद्दल बोलताना दिसतो. मात्र तो कधीच आपल्या वडिलांबद्दल बोलताना दिसत नाही. त्याच्या वडिलांचं नाव आर के शेखर होतं आणि तेदेखील संगीद दिग्दर्शक होते. त्यांच्या मृत्यूनंतर एआर रहमानने धर्मांतर केलं आणि हिंदू धर्म स्विकारला.   

| Oct 24, 2024, 20:31 PM IST

1/11

2/11

संगीतकार आणि ऑस्कर विजेता एआर रहमानचे नाव केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. एआर रहमान यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. आपले वडील आणि संगीतकार आर के शेखर यांच्याकडूनच त्याला हा वारसा मिळाला. संगीत क्षेत्रात आज त्याने खूप नाव कमावलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर एआर रहमानला फार संघर्ष करावा लागला. हा संघर्ष तो कधीच विसरु शकत नाही.  

3/11

एआर रहमानचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. त्याचं खरं नाव दिलीप कुमार होते. तथापि, दिलीप वडिलांच्या मृत्यूनंतर इतका उद्ध्वस्त झाला की, त्याने अखेर इस्लाम धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने नाव बदलून एआर रहमान म्हणजेच अल्लाह रखा रहमान ठेवण्यात आलं.  

4/11

एआर रहमान अनेकदा त्याच्या मुलाखती दरम्यान संगीत आणि त्याच्या कुटुंबाबद्दल बोलतो, परंतु त्याच्या वडिलांबद्दल नाही. पण नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्याने वडील आरके शेखर यांच्याबद्दल मोकळेपणाने सांगितले.  

5/11

एआर रहमानने आपण वडिलांबद्दल बोलणं का टाळतो? याचं कारणही सांगितलं. मुलाखतीदरम्यान एआर रहमानने सांगितलं की, वडिलांचा मृत्यू खूप वेदनादायक होता, ज्याची आठवण करून आजही भिती वाटते. त्यामुळे तो यावर बोलणे टाळतो. त्याच्या मते, त्याच्या वडिलांचा मृत्यू एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता.   

6/11

रहमान म्हणतो की, वडिलांच्या मृत्यूनंतर इलैयाराजा यांनी त्यांना जे सांगितलं ते त्यांना अजूनही आठवते. त्यांनी रहमानला सांगितलं की, त्याचे वडील त्याला संगीत रेकॉर्डिंगला का घेऊन जायचे?  

7/11

इलैयाराजा यांनी सांगितलं की, ते रहमानला म्युझिक रेकॉर्डिंगला घेऊन जायचे कारण त्या पैशात तो आपलं शिक्षण पूर्ण करु शकेल.   

8/11

रहमानने सांगितलं की,  त्याचे वडील खूप दयाळू, उदार आणि आनंदी होते, ज्यांनी त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. पण त्याचा शेवट खूप वेदनादायक होता. त्यांचा चेहरा अगदी अशक्त झाला होता. सांगाड्याप्रमाणे ते दिसत होते. त्यांची हाडंही कमकुवत होऊ लागली होती. ती आठवण माझ्यासाठी त्यांच्या मृत्यूइतकीच वेदनादायी आहे. त्यामुळे मी बोलणं टाळतो.   

9/11

रहमान पुढे सांगितलं की, 'तरीही मला वाटते की त्यांचे आशीर्वाद माझ्या बहिणींवर आणि माझ्यावर कायम आहेत.'   

10/11

एआर रहमानने आपण आपल्या आईकडून काय शिकलो हेदेखील सांगितलं. रहमान म्हणाला, 'ती फार खंबीर व्यक्ती आहे. त्यांच्यासोबत जे काही घडले आणि त्यांने जे काही सहन केले, त्यानंतरही आयुष्यात कधीही हार मानली नाही.   

11/11

वडिलांचं निधन झाले चेव्हा रहमान केवळ 9 वर्षांचा होता. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्या डोक्यावर आल्या होत्या. त्यानंतर त्याने संगीताच्या दुनियेत प्रवेश केला.