भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS Imphal; पाहा कसा करणार शत्रूचा नायनाट

INS Imphal ची अनेक वैशिष्ट्ये असून, ही युद्धनौका हिंदी महासागरामध्ये तैनात करम्यात येणार आहे. पाहून घ्या या युद्धनौकेची वैशिष्ट्ये 

Dec 26, 2023, 15:32 PM IST

INS Imphal : भारतीय नौदलाची ताकद वाढवण्याच्या हेतूनं आता नौदलाच्या ताफ्यात आयएनएस इंफाळचा समावेश करण्यात आला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असणाऱ्या या युद्धनौकेतून शत्रूवर अचूक मारा करता येणार आहे. 

1/7

पूर्वोत्तर शहराचं नाव

INS Imphal indian navy fatures latest news

भारताच्या पूर्वोत्तरेला असणाऱ्या शहरावरून नाव असणारी ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला. 

2/7

शस्त्रास्त्र सुसज्ज

INS Imphal indian navy fatures latest news

अण्वस्त्र, बायो वेपन, केमिकल वेपन अशा कोणत्याही माऱ्यामध्ये ही युद्धनौका तग धरू शकते.   

3/7

क्षेपणास्त्र

INS Imphal indian navy fatures latest news

INS Imphal च्या क्षमतेत वाढ करण्यासाठी तिच्यावर ब्रह्मोसही तैनात ठेवण्यात आलं आहे. शिवाय या युद्धनौकेवर मध्यम ते अधिक अंतरावरील लक्ष्यभेद करणारी इतरही क्षेपणास्त्र आहेत. 

4/7

सुपर रॅपिड गन

INS Imphal indian navy fatures latest news

या युद्धनौकेवर रोधी पाणबुडी, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि सुपर रॅपिड गनही तैनात करण्यात आल्या आहेत.   

5/7

ताशी वेग

INS Imphal indian navy fatures latest news

ताशी 56 किमी म्हणजेच ताशी 30 समुद्री मैल वेगानं जाणाऱ्या या युद्धनौकेवरील रडारच्या माध्यमातून क्षणात शत्रूचा शोध घेऊन नायनाट करता येऊ शकतो. 

6/7

स्वदेशी युद्धनौका

INS Imphal indian navy fatures latest news

INS Imphal ची लांबी 535 फूट असून, या युद्धनौकेचं वजन 7400 टन इतकं असून, युद्धनोकेची निर्मिती करण्यासाठी 75 टक्के स्वदेशी सामानाचा वापर करण्यात आला आहे.   

7/7

नौदलाची ताकद

INS Imphal indian navy fatures latest news

या युद्धनौकेच्या माध्यमातून चीनसारख्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी नौदलाची ताकद वाढणार आहे.