स्मार्टफोनऐवजी माणसाच्या शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप?
प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होणार आहे.
Trending News : स्मार्टफोनशिवाय आपला दिवस सुरु होत नाही आणि संपतही नाही. माणसानं स्मार्टफोनमध्ये जग शोधलंय. घरगुती फोन, कॉडलेस, साध्या मोबाईलपासून सुरु झालेला प्रवास दोन दशकात स्मार्टफोनपर्यंत आलाय. पण आता हेच स्मार्टफोन जगातून कायमचे गायब होऊ शकतात. भविष्यात स्मार्टफोनऐवजी माणसाच्या शरिरावरच सिमकार्ड आणि चिप लागणार आहेत.