विना नेटवर्कशिवाय दुसऱ्या नंबरवर Phone कॉल करु शकता, पाहा कसे ते?

.

Apr 02, 2021, 08:16 AM IST

मुंबई :  नेटवर्क बिघाडामुळे, अनेकदा कॉल करण्यात समस्या येत असतात. परंतु आता लोकांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही. आता वापरकर्ते त्यांच्या नंबरवरून नेटवर्कशिवाय इतर कोणत्याही नंबरवर कॉल करण्यास सक्षम असतील. चला कसे ते जाणून घेऊया ...

1/5

अनेक दूरसंचार ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांना वाय-फाय कॉलिंग सुविधा देत आहेत, ज्याच्या मदतीने नेटवर्कशिवाय देखील कॉलिंग करता येते. अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेट करणारे अनेक फोनमध्ये हे इनबिल्ट वैशिष्ट्य आहे, फक्त ते ऑन करावे लागेल.

2/5

आयफोन वापरणाऱ्यांना आधी फोनच्या सेटींगला जावे लागेल आणि त्यानंतर चेक वाय-फाय कॉलिंग वर क्लिक करावे लागेल. येथे आपल्याला वायफाय कॉलिंग चालू करावे लागेल. यानंतर, आपल्याला मागील बटणावर दाबून मागील स्क्रीनवर जावे लागेल. तेथे आपल्याला 'अन्य डिव्हाइस' वर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला इतर फोनसाठी हे फीचर चालू करावे लागेल.

3/5

Android वापरकर्त्यांना प्रथम सेटिंग्ज नेटवर्क आणि इंटरनेट आणि नंतर वायफाय कॉलिंग तपासावे लागेल. आपल्याला आपल्या टेलिकॉम ऑपरेटरने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे लागेल. यानंतर, आपण आपल्या स्मार्टफोनवर वायफाय कॉलिंग ऑन करा.

4/5

हे फीचर अनेबल होताच आपण कोणत्याही आयफोनशिवाय आपल्या आयफोनवरून कॉल करु शकता. यासाठी, आपला फोन 'वाय-फाय'शी कनेक्ट केलेला असावा. आपले नेटवर्क प्रदान करण्यासाठी Wi-Fiचा सपोर्ट  आहे की नाही हे देखील पाहा. आपण ग्राहक सेवेशी बोलून देखील माहिती मिळवू शकता.

5/5

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या एयरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आपल्या वापरकर्त्यांना मोफत वायफाय कॉलिंग सुविधा देत आहे. यासाठी आपल्याला कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. तथापि, बीएसएनएल वापरकर्त्यांना वायफाय कॉलिंग करण्यासाठी विंग्स अॅप डाउनलोड करावे लागेल आणि सेवेसाठी 1099 रुपये नोंदणी शुल्क देखील भरावे लागेल.