संजीव गोयंका, नीता अंबानी की काव्या मारन! हे आहे आयपीएलच्या 10 संघांचे मालक... कोण किती श्रीमंत?

IPL 2024 : आयपीएल 2024 स्पर्धा आता चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचलीय. प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतील हे येत्या काही सामन्यात स्पष्ट होईल. त्याआधी हैदराबादविरुद्ध लखनऊचा झालेल्या पराभवानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलला झापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानिमित्ताने आयपीएलच्या 10 संघांचे मालक कोण आहेत आणि किती श्रीमंत आहेत याची चर्चा रंगली आहे. 

राजीव कासले | May 10, 2024, 18:32 PM IST
1/10

मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची मालकी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडे आहे. मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 9,962 करोड रुपये इतकी आहे. रिलायन्स इंडस्ट्री ही देशातील अग्रगण्य कंपनी आहे. रिलायन्स कंपनीचा बाजार भांडवल 17.05 लाख करोड आहे. मुंबई इंडियन्सची मालकिन नीता अंबानी यांची एकूण संपत्ती 23,199 करोड रुपये आहे.

2/10

चेन्नई सुपर किंग्स

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडिया सीमेंट्सच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा. चेन्नई सुपर किंग्सनेही पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. Chennai Super Kings ची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी रुपये आहे. चेन्नई सुपर किंग्सची फ्रॅचाईजी असलेल्या इंडिया सीमेंट्सची मालकी एन श्रीनिवासन यांच्याकडे आहे . त्यांची एकूण संपत्ती 720 कोटी रुपये इतकी आहे.

3/10

कोलकाता नाइट राइडर्स

कोलकाता नाईट रायडर्सची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी रुपये इतकी आहे. केकेआरची मालकी रेड चिली इंटरटेनमेंटकडे आहे. यात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री जूही चावला तसंच जय मेहता यांची गुंतवणूक आहे. 

4/10

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादची ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी रुपये इतकी आहे. या संघाची मालकी   Sun TV Network कडे आहे. त्याची CEO काव्या मारन आहे. काव्या मारन ही सन ग्रुपचे फाऊंडर कलानिथि मारन यांची मुलगी ाहे. काव्या 409 कोटी रुपयांची मालकीन आहे.

5/10

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सची ब्रँड व्हॅल्यू  7,930 कोटी रुपये आहे. या संघाची मालकी जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपकडे आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजीचे चेअरपर्सन पार्थ जिंदाल आहेत.  

6/10

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स की  ब्रँड व्हॅल्यू 7,662 कोटी रुपये आहे. या संघाची मालकी  Royal Multisport Pvt. Ltd कडे आहे. संघाचे मालक मनोज बडले आणि लचलान मर्डोक आहेत.

7/10

पंजाब किंग्स

आयपीएलमधल्या पंजाब किंग्सची  ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी रुपये इतकी आहे. याची मालकी मोहित बर्मन, नेस वाडिया, अभिनेत्री प्रीति झिंटा आणि करण पाल यांच्याकडे आहे.

8/10

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्स ब्रँड व्हॅल्यू  8,236 कोटी रुपये इतकी आहे. या संघाची मालकी आरपीएसजी वेंचर्स लिमिटेडकडे आहे. RPSG कंपनीचे मालक संजीव गोयंका आहेत.

9/10

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सची ब्रँड व्हॅल्यू  6,512 कोटी रुपये आहे. या संघाची मालकी सीवीसी कॅपिटल्सकडे आहे. या कंपनीचे मालक Steve Koltes आणि Donald Mackenzie आहेत

10/10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ब्रँड व्हॅल्यू 7,853 कोटी रुपये आहे. याची मालकी United Spirits Limited कडे आहे.