IPL मधील 5 मोठे वाद

Apr 06, 2021, 17:17 PM IST
1/6

पोलार्ड-स्टार्क

पोलार्ड-स्टार्क

आयपीएल 2014 मध्ये पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यात वाद झाला होता. स्टार्कने पोलार्डला आधी काहीतर म्हटलं होतं. त्यानंतर पोलार्डने त्याला जावून गोलंदाजी करायला सांगितली.  यानंतर स्टार्क बॉलिंग टाकण्यासाठी धावत असताना पोलार्ड क्रिज सोडून बाजुला निघून गेला. स्टार्कने त्याला बॉल मारण्याचा प्रयत्न केला. तर पोलार्डने देखील त्याच्या दिशेने बॅट फेकली. यानंतर दोघांना दंड भरावा लादला होता.

2/6

जेव्हा कॅप्टन कूल भडकला

जेव्हा कॅप्टन कूल भडकला

2019 च्या आयपीएलमध्ये कॅप्टन कूल धोनीला लोकांनी भडकताना पाहिलं होतं. सीएसके आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान एका सामन्यात सीएसकेच्या बॅटींग दरम्यान अंपायरच्या एका निर्णयावर धोनी भडकला होता. डग आऊटमध्ये बसलेला धोनी सरळ मैदानात आला होता. यासाठी धोनीला दंड देखील भरावा लागला होता.

3/6

अश्विन आणि बटलर

अश्विन आणि बटलर

आयपीएल 2019 दरम्यान किंग्स इलेवन पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला मांकडिंग करत रनआऊट केलं होतं. या प्रकरणात बराच वाद झाला होता.

4/6

शाहरुख खानचा सुरक्षारक्षकासोबत वाद

शाहरुख खानचा सुरक्षारक्षकासोबत वाद

आयपीएल 2012 मध्ये शाहरुख खानचा वानखेडे स्टेडिअममधील सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला होता. शाहरुख मैदानात जात असताना त्याला सुरक्षा रक्षकाने रोखलं होतं. यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शाहरुखच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याने नशेत अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे 5 वर्ष त्याला वानखेडे स्टेडिअमवर बंदी घालण्यात आली होती.

5/6

विराट-गंभीर

विराट-गंभीर

2013 मध्ये आरसीबी आणि केकेआरमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली आउट झाल्यानंतर गौतम गंभीर काही तरी बोलला होता. ज्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला होता. यानंतर रजत भाटिया याने दोन्ही खेळाडूंना वेगळं केलं होतं.

6/6

हरभजन आणि श्रीसंत

हरभजन आणि श्रीसंत

2008 मध्ये सुरु झालेल्या या टूर्नामेंटमध्ये एका सामन्यात हरभजन सिंहने एस श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती. त्यानंतर श्रीसंत भर मैदानात रडला होता. बीसीसीआयने हरभजनला यासाठी 2008 चं संपूर्ण सीजनसाठी बंदी घातली होती.