IPL 2023 : अर्शदीप सिंगने तोडलेल्या स्टंपची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध स्टंप तोडून मोठे नुकसान केले आहे.  

Apr 23, 2023, 10:23 AM IST
1/7

एकदा नव्हे दोनदा तोडला स्टंप

IPL 2023 arshdeep singh

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने सामन्याच्या शेवटच्या षटकात एकदा नव्हे तर दोनदा मधले स्टंप तोडून आयपीएलच्या आयोजकांचे लाखोंचे नुकसान केल्याचे म्हटले जात आहे.

2/7

अर्शदीप सिंगने तोडला मिडल स्टंप

Arshdeep Singh Breaks Middle Stump

अर्शदीपने शेवटच्या शतकात आधी तिलक वर्माला बोल्ड केले आणि त्यानंतर नेहल वढेराला त्याच पद्धतीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीपच्या गोलंदाजीने दोन्ही वेळा स्टंप तुटल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र आता या स्टंपची किंमत किती असते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

3/7

स्टंप किंमत माहितीये का?

stump price

माध्यमांच्या वृत्तानुसार, स्टंपच्या सेटची किंमत 25 ते 30 लाखांच्या दरम्यान आहे. स्टंपच्या सेटसोबत तीन चेंडूंही येतात. याशिवाय स्टंपवर ठेवलेल्या जिंग्स बेल्सची किंमत जवळपास 50 हजार रुपये  आहे.

4/7

स्टंपच्या दोन सेटचा होतो वापर

IPL stumps

आयपीएल स्टंपचे दोन सेट दोन्ही बाजूंना वापरले जातात. एका स्टंपच्या सेटची किंमत 25 लाख मानली, तर 50 लाख किमतीचे स्टंप आणि 1 लाख किमतीचे बेल्स सामन्यादरम्यान वापरले जातात. 

5/7

मुंबईने 17 षटकांत केल्या 175 धावा

MI vs PBKS

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने दिलेले 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 17 षटकांत 175 धावा केल्या होत्या. मुंबईला शेवटच्या 3 षटकात 40 धावांची गरज होती.

6/7

19व्या षटकात दिल्या 15 धावा

arshdeep singh IPL

18 व्या षटकात अर्शदीपने सूर्यकुमार यादवला 57 धावांवर बाद करत केवळ 9 धावा दिल्या. तर दुसरीकडे 19व्या षटकात नॅथन एलिसने 15 धावा दिल्या. मुंबईला आता शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती.  

7/7

शेवटच्या षटकात केली कमाल

arshdeep singh wickets

शेवटच्या षटकात आलेल्या अर्शदीपने  पहिल्या दोन चेंडूत एक धाव दिली आणि तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माची विकेट घेतली. तिलक बाद झाल्यानंतर नेहल वढेराने पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही तिलक वर्माप्रमाणे बाद झाला.