IPL 2020: आयपीएलमध्ये ४०० हून अधिक धावा करणारे टॉप-५ कर्णधार

Sep 08, 2020, 12:37 PM IST
1/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वात मुंबई इंडियंस (Mumbai Indians) ने सर्वाधिक ४ वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. त्याने ७ सीजनमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने डेक्कन चार्जेर्ससाठी २००८ मध्ये ४०४ धावा आणि २०१० मध्ये ४०४ रन केले होेते. त्यानंतर तो मुंबई इंडियंसमध्ये आला. त्याने २०१२ मध्ये ४३३ धावा, २०१३ मध्ये ५३८ धावा, २०१५ मध्ये ४८२ धावा, २०१६ मध्ये ४८९ धावा, २०१९ मध्ये ४०५ धावा केल्या होत्या.

2/5

विराट कोहली

विराट कोहली

विराट कोहली (Virat kohli) सर्वाधिक वेळा ४०० हून अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंय ६ वेळा हा रेकॉर्ड केला आहे. आरसीबीसाठी खेळणाऱ्या विराटने २०११ मध्ये ५५७ धावा, २०१३ मध्ये ६३४ धावा २०१५ मध्ये ५०५ धावा, २०१६ मध्ये ९७३ धावा, २०१८ मध्ये ५३० धावा तर २०१९ मध्ये ४६४ धावा केल्या होत्या. एक बॅट्समन म्हणून ५०० हून अधिक धावा करणारा आणि एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.

3/5

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर देखील या यादीत आहे. ४०० हून अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो विराटच्या बरोबरीत आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नरनेही ४ वेळा ४०० हून अधिक रन केले आहेत. २००९ पासून आयपीएल खेळणार्‍या वॉर्नरने २०१३ च्या हंगामात प्रथमच ४१० धावा, २०१४ मध्ये ५२८ धावा, २०१५ मध्ये ५६२ धावा, २०१६ मध्ये ८४८ धावा, २०१७ मध्ये ६४१ धावा, २०१९ मध्ये ६९२ धावा केल्या आहेत. २०१८ मध्ये त्याच्यावर बंदी असल्याने त्याला या सीजनमध्ये खेळता आलं नव्हतं.

4/5

गौतम गंभीर

गौतम गंभीर

आयपीएल (IPL) हंगामात ४०० हून अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसरे नाव गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे आहे. गंभीर आता आयपीएलचा भाग नाही. पण त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून त्याने ५३४ धावा, २०१२ मध्ये केकेआरसाठी ५९० धावा, २०१३ मध्ये ४०६ धावा, २०१६ मध्ये ५०१ धावा आणि २०१७ मध्ये ४९८ धावा गंभीरने केल्या आहेत.

5/5

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर ४ वेळा ४०० हून अधिक धावा बनवण्याचा विक्रम आहे. धोनी (Dhoni) ने २००८ मध्ये ४१४ धावा, २०१३ मध्ये ४६१ धावा, २०१८ मध्ये ४५५ धावा तर २०१९ मध्ये ४१६ धावा केल्या आहेत. तर इतर ८ सीजनमध्ये त्याने ५ वेळा ३०० हून अधिक धावा केल्या आहेत.