तुझ्या बॅटमध्ये काही आहे का? सिक्स पाहून हैराण झालेल्या अंपायरला रोहितचं उत्तर, म्हणाला...

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या 86 रन्सच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ICC ODI World Cup 2023 च्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानचा सहज पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पहायला मिळाले.

Surabhi Jagdish | Oct 15, 2023, 13:25 PM IST
1/5

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 63 बॉल्समध्ये 6 फोर आणि 6 सिक्सच्या जोरावर 86 रन्स केले.

2/5

रोहित शर्मा ज्या सहजतेने सिक्स मारत होता, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माचे लांबलचक सिक्स पाहून अंपायरही चकित झाले. यावेळी त्यांनी रोहितला विचारलं की, त्याच्या बॅटमध्ये काही आहे का?

3/5

या सामन्यादरम्यान मैदानी अंपायर मराइस इरास्मस होते. यावेळी त्यांचा आणि रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये रोहित शर्मा अंपायरला त्याचे मसल्स दाखवताना दिसत होता.

4/5

बीसीसीआयने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला विचारतोय की, ते सेलिब्रेशन नेमकं काय होतं?

5/5

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, "अंपायर विचारत होते की, तू एवढे लांब सिक्स कसे मारतोस, तुझ्या बॅटमध्ये काहीतरी आहे... मी त्यांना म्हणालो, भाई, बॅटमध्ये काही नसून ही पॉवर आहे."