इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि पंतप्रधान मोदींनी केली एकमेकांची प्रशंसा

Jan 15, 2018, 16:03 PM IST
1/9

भारत आणि इस्राईल यांच्यामध्ये ९ महत्त्वाचे करार झाले. अनेक मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली.

2/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिब्रू भाषेमध्ये भाषणाची सुरुवात केली. मोदींनी हिब्रूमध्ये नेतन्याहू यांचं स्वागत केलं.

3/9

आमच्यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. २५ वर्षाची ही मैत्री खूप महत्त्वाची असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

4/9

'मोदी हे क्रांतिकारी नेते आहेत. ज्यांचं व्हिजन खूप स्पष्ट आहे. ही माझी ऐतिहासिक यात्रा असल्याचं', नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

5/9

बेंजामिन नेतन्याहू यांनी हाइफामध्ये शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.

6/9

सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.

7/9

नेतन्याहू यांनी पत्नी सारा सोबत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन श्रद्धाजंली वाहिली.

8/9

गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर नेतन्याहू यांनी म्हटलं की, आमची मैत्री शांती आणि समृद्धी आणेल'

9/9

मोदींच्या इस्राईल दौऱ्यापासून आमची मैत्री सुरु झाली. आमची मैत्री दोन्ही देशांमध्ये शांती आणेल. - पंतप्रधान नेतन्याहू