'या' देशातील तरुणी स्वत:च्या छातीला हात लावत शेअर करत आहेत Video, Photos; कारण...
Italians Grope Themselves Photos Videos Goes Viral: मागील काही दिवसांपासून अनेक तरुणींने स्वत:चीच छाती पकडल्याचे किंवा पार्श्वभागाला हात लावत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. सध्या जगभरामध्ये या सर्व गोष्टींची चर्चा सुरु आहे. मात्र नेमकं असं घडलंय तरी काय? हा प्रकार काय आहे? या तरुणी आणि तरुण असे फोटो, व्हिडीओ का पोस्ट करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
1/15
2/15
3/15
4/15
5/15
6/15
इटलीमधील एका न्यायाधिशांनी 17 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपीला निर्दोष सोडण्यामागील कारण हे फारच संतापजनक आहे. न्यायाधिशांनी दिलेल्या निकालामध्ये आरोपीने 10 सेकंदांपेक्षा कमी वेळ या मुलीची छेड काढल्याने त्याला निर्दोष मुक्त केलं जात असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणानंतर इटलीमधील तरुणांनी सोशलम मीडियावर फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याचं ऑनलाइन आंदोलन सुरु केलं आहे.
7/15
'मेट्रो' वृत्तपत्राने इटलीमधील 'कोरिएरे डेला सेरा' नावाच्या वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हा छेडछाडीचा प्रकार रोममध्ये घडला. मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पीडित तरुणी आपल्या मित्राबरोबर भटकंतीसाठी गेली होती. त्यावेळेस कोणीतरी आपलं अंतवस्त्र खेचून पार्श्वभागाला हात लावत असल्याचं या तरुणीला वाटलं.
8/15
9/15
या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. तपासादरम्यान एंटिनियोने चुकीच्या पद्धतीने आणि या तरुणीच्या संमतीशिवाय तिला स्पर्श केल्याचं आणि जबरदस्तीने तिला जागेवर उभं करण्याचा प्रयत्न केल्याचं मान्य केलं. मात्र आपण हे मस्करीमध्ये केल्याचंही एंटिनियोने पोलिसांना सांगितलं.
10/15
11/15
12/15
या निकालासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जात आहे. त्याचा हात माझ्या शरीरावर होता हे समजण्यासाठी काही सेकंदांचा स्पर्श पुरेसा होता. मला वाटतंय की देशातील संस्थांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. मला न्याय मिळाला नाही, अशा शब्दांमध्ये या निकालाबद्दल पीडित तरुणीने नाराजी व्यक्त केली आहे.
13/15
14/15
15/15