KL Rahul: कधी-कधी हरणं पण ठीक...; सामना जिंकूनही असं का म्हणाला केएल राहुल?

KL Rahul: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जाएंट्सने यंदाच्या सिझनमध्ये सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली आहे. यावेळी दुसऱ्या पराभवानंतर काय म्हणाला केएल राहुल पाहूया. 

Surabhi Jagdish | Apr 03, 2024, 08:15 AM IST
1/7

आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर केएल राहुल म्हणाला, आम्ही चांगली कामगिरी केलीये. 

2/7

राहुल म्हणाला, विकेट थोडी कठीण होती आणि वेगवान गोलंदाजांची मदत मिळत होती. या सामन्यात डिकॉकने चांगली फलंदाजी केली.

3/7

मयंकने उत्कृष्ट गोलंदाजी केली. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर त्याने चांगली गोलंदाजी केली असल्याचं राहुलने म्हटलंय.

4/7

राहुलच्या म्हणण्यानुसार, टॉस गमावणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आकडेवारीवर नजर टाकली तर आम्ही टारगेटला डिफेंड करताना अधिक सामने जिंकले आहेत.

5/7

कधी-कधी हरणं पण ठीक असतं, पहिला सामना असाच एक होता. मात्र आम्ही पद्धतीने कमबॅक केलं असल्याचं, केएल राहुलने म्हटलंय.

6/7

पॉवरप्लेमधील गोलंदाजीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. मात्र हे दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय, असंही राहुलने सांगितलं

7/7

राहुलच्या सांगण्यानुसार, यापुढे आम्ही पॉवर प्लेमध्ये आम्ही विकेट घेण्याच्या पर्याय शोधण्यावर काम करू.