'कृपया, आमच्या घरातून काही चोरु नका'; जान्हवी कपूरने पाहुण्यांना का केली ही अजब विनंती?

बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं चैन्नईतलं घर आता सर्वसामान्यांसाठी उघडं झालं आहे. त्या सी-फेसिंग घराला आता जान्हवी आणि बोनी कपूर यांनी हॉटेलचं रुप दिलं. जान्हवी कपूरनं या प्रॉपर्टीवर राहण्याची संधी आता तिच्या चाहत्यांना दिली आहे. मात्र, यावेळी तिनं तिच्या चाहत्यांना एक विनंती केली आहे. 

| May 04, 2024, 16:21 PM IST
1/7

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरनं श्रीदेवी यांचं हे घर Airbnb यांच्या आयकन सीरिजमध्ये हॉटेलच्या रुपात दिलं आहे. आता त्याच्या लॉन्चच्या कार्यक्रमात जान्हवी कपूरनं या घरात असलेल्या तिच्या या आठवणींना उजाळा दिला. 

2/7

सगळ्यांचे वाढदिवस तिथे साजरी झाले

जान्हवीनं सांगितलं की आम्ही आमच्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा केला. माझा आणि वडिलांचा देखील तिथे साजरा केला. पण आम्ही तिथे इतका वेळ व्यथित करत नव्हतो. कारण आम्हाला ते रेनोव्हेट करायचं होतं. आईला त्याला हॉटेल बनवायचं होतं.   

3/7

पूर्ण केली श्रीदेवींची इच्छा

श्रीदेवी यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बोनी कपूर यांना त्या घराला हॉटेलमध्ये बदलायचे होते. आई गेल्याच्या दोन वर्षांनंतर आम्ही जेव्हा त्यांचा वाढदिवस तिथे साजरा केला तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी आनंदी पाहिलं. 

4/7

फ्रीमध्ये राहण्याची संधी

ज्या लोकांना या घरात फ्रीमध्ये रहायचं आहे. त्यांच्यासाठी 4000 गोल्डन तिकिट आहेत. ज्यांना हे तिकिट मिळेल त्यांना तिथे फुकटात रहायला मिळेल.

5/7

कंपनी ठरवेल कोणाला द्यायचं तिकिट?

पाहुणे असल्यानं त्यावर कंपनी काही इनपुट्स घेऊल आणि त्या आधारावर निर्णय घेतील की कोणाला हे तिकिट देण्यात येईल. 

6/7

जान्हवी कपूरनं चाहत्यानं केली विनंती

जान्हवीनं चाहत्यांना विनंती केली आहे की "कृपया कोणत्या गोष्टीची चोरी करु नका. माझा माझ्या चाहत्यांवर खूप विश्वास आहे आणि प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर माझा Airbnb देखील विश्वास आहे. ते त्यांच्या विश्वासासाठी ओळखले जातात. त्यामुळे तिथे जे रहायला येतील कोणत्या गोष्टीची चोरी करु नका."

7/7

पाहुण्यांना काय काय वापरता येईल?

येणाऱ्या पाहुण्यांना 1 बेडरुम आणि बाथरुम वापरता येणार आहे. त्यासोबत त्यांना दाक्षिणात्य जेवणाचा आनंद घेता येईल. जे एक दिवस राहतील त्यांना जान्हवीसोबत तिचे ब्युटी हॅक्स विषयी तिच्याकडून जाणून घेता येईल. जे तिला आईकडून मिळाले आहेत.