चंद्रावर जाणारा मनुष्य रहस्यमयी कैलास पर्वतावर का चढाई करु शकला नाही? बौद्ध आणि हिंदू धर्माशी थेट कनेक्शन
कैलास पर्वत हे अनेक रहस्य असेलले सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. कैलास पर्वत स्वर्ग हा आणि पृथ्वी दरम्यान एक जिना मानला जातो.
Kailash Parvat Mystery : माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे. असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र, आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र का मानतात. जाणून घेवूया कैलास पर्वताची रहस्ये.


सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असा दावाही केला जातो.

कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. पर्वताचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. यामुळेच गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे येथे हेलीकॉप्टर देखीव भरकटतात. कैलास पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे आणि दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात.येथील हवामानात मानवाची प्रकृती बिघडते.


