'खलिस्तानी, तुमची हीच लायकी..'; CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संतापली बहीण रंगोली

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची खासदार कंगना रणौतला चंडीगढ विमानतळावर CISF च्या जवाननं कानशिलात लगावली. त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. आता या प्रकरणात  कंगनाची बहीण रंगोलीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. रंगोलीनं या सगळ्या प्रकरणात तिची संपत्त रिअॅक्शन दिली आहे.   

| Jun 07, 2024, 16:55 PM IST
1/7

CISF जवान झाली सस्पेंड

कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला सस्पेंड करण्यात आलं आहे. तर अधिकाऱ्यांनी या घटनेच्या मागे काय कारण आहे. तर CISF जवान महिलेनं सांगितलं की कुलविंदर कौरला कंगनाचं शेतकऱ्यांविरोधात असलेलं वक्तव्य आवडलं नव्हतं. त्यामुळे तिनं हे कृत्य केलं.

2/7

रंगोली चंदेलनं दिली प्रतिक्रिया

कंगना रणौतनं या घटनेवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर रंगोलीनं सोशल मीडियावर या प्रकरणावर रिअॅक्शन दिली आहे. तर यावेळी रंगोली संतापली होती. 

3/7

रंगोली म्हणाली...

पोस्ट शेअर करत रंगोल म्हणाली की, 'खलिस्तानी लोकांनो, तुमच्या लोकांची फक्त एवढीच लायकी आहे. मागून सगळं प्लॅन करतात आणि हल्ला करणं. पण, माझी बहिणी ही मोडेन पण वाकणार नाही या विचारसरणीची आहे. तुम्ही तिचं काहीही करु शकत नाही. ती तिच्या पद्धतीनं हे सगळं हाताळेल. पण पंजाब तुझं काय करणार? शेतकऱ्यांचं अड्डा होता. आणखी एक गोष्ट म्हणजे हे सिद्ध झालं आहे की हे सगळं सिक्योरिटीच्या चुकीमुळे झालं आहे. अशा प्रकारे व्हायला नको. आपण सगळ्यांनी या विरोधात बोलायला हवं.'

4/7

कंगनाचा व्हिडीओ व्हायरल

कंगना रणौतनं दिल्लीला पोहोचल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. कंगनाच्या म्हणण्याप्रमाणे दिल्ली जाण्यासाठी विमानतळाच्या लाउंज एरियामध्ये होती. जशी ती बोर्डिंग एरियाच्या जवळ जाऊ लागली. 

5/7

कंगनाला मारली कानशिलात

तिथे CISF च्या महिला जवान आली आणि तिनं कंगनाच्या कानशिलात लगावली. कंगनासोबत वाद घालू लागली. त्यानंतरचा संपूर्ण प्रकार हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

6/7

का CISF च्या महिला जवान लगावली कानशिलात?

कंगनानं शेतकऱ्यांच्या आंदोलनावर एक वक्तव्य केलं होतं. त्यात विषयी बोलत CISF च्या महिला जवान म्हणाली की '100-100 रुपयांमध्ये आंदोलनात महिला बसल्या आहेत. त्या आंदोलनात माझी आई देखील बसली होती.' 

7/7

कंगनाचा व्हिडीओ व्हायरल

कंगनानं या संपूर्ण प्रकरणा विषयी सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याला पाहून काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.