आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण

Jan 31, 2018, 21:31 PM IST
1/6

करंजचे वजन सुमारे 1700 टन असून  समुद्रात सलग 40 दिवस संचार करण्याची क्षमता आहे.  एका पल्ल्यात 5000 किमीपेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याखाली 350 मीटरपर्यंत खोल जाण्याची क्षमता आहे. डिसेंबरपर्यंत करंज नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.

2/6

भारतीय नौदलाची ताकद वाढण्याच्या दृष्टीने कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण झालं.एका पल्ल्यात 5000 किमीपेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याखाली 350 मीटरपर्यंत खोल जाण्याची क्षमता आहे.  

3/6

भारतीय नौदलाची ताकद असणाऱ्या कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण झालं. यावेळी अशा उत्साहात स्वागत करण्यात आले.

4/6

पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण करण्यात आले यावेळी पारंपरिक विधीसह संस्कृत श्लोकांचे पठन करण्यात आले. यावेळी नौदल प्रमुख अँडमिरल सुनील लांबा यांच्या पत्नी रीना लांबा उपस्थित होत्या.

5/6

तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण. नौदल प्रमुख अँडमिरल सुनील लांबा यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या हस्ते हे जलावतरण झाले.

6/6

भारतीय नौदलाची ताकद वाढण्याच्या दृष्टीने बुधवारी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचं माझगांव डॉकमध्ये जलावतरण झालं. यापुढील काही महिने आयएनएस करंज पाणबुडी समुद्रातील चाचण्यांना सामोरी जाईल. डिसेंबर अखेरीस ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणं अपेक्षित आहे.