इरसालवाडी दुर्घटनेनंतर बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची का होतेय चर्चा?
मध्ये हवामान, भूकंप, वादळ यामुळे लोकांना विनाशाचा सामना करावा लागू शकतो, असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं होतं. दरम्यान इरसालवाडीमध्ये दरड कोसळणे, यासोबतच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या विविध दुर्घटना घडणे हा बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा भाग तर नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.
Irshalwadi Landslide : मध्ये हवामान, भूकंप, वादळ यामुळे लोकांना विनाशाचा सामना करावा लागू शकतो, असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं होतं. दरम्यान इरसालवाडीमध्ये दरड कोसळणे, यासोबतच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या विविध दुर्घटना घडणे हा बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा भाग तर नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.
इरसालवाडी दुर्घटनेनंतर बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची का होतेय चर्चा?

Baba Vanga Predictions: जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी वाडीवर ही दरड कोरळली असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू ओढावला आहे. इथं 25 हून अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली असून त्यातून जवळपास 75 ते 80 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीनंतर बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगा कोण आहेत, त्यांनी काय भविष्यवाणी केली? त्यातील कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या याबद्दल जाणून घेऊया.
9/11 घटनेची भविष्यवाणी

अणुऊर्जा प्रकल्पात स्फोटाचा इशारा

2023 वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये अणु हल्ला होईल, ज्यामुळे पृथ्वीवर भयंकर विनाश होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीला तिसरं महायुद्ध असं नाव देण्यात आलं आहे. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोटाचा इशारा दिला होता. या अणुस्फोटातून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळे सर्वत्र कहर होईल, असंही वेंगा यांनी म्हटलं होतं.
बाबा वेंगा यांचं जन्म 1911 साली

बाबा वेंगा यांचं जन्म 1911 साली झाला होता. ते युरोपातील बल्गेरिया येथे राहत होते. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. मात्र, त्यांनी डोळ्यांच्या बदल्यात भविष्य पाहण्याची कला अवगत केली असं म्हणतात. बाबा वेंगा यांचे ऑगस्ट 1996 मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती.
आशियाई देशांमध्ये पूर

2022 या वर्षासाठी बाबा वनगा यांनी 6 भाकिते केली होती. त्यापैकी 3 खऱ्या ठरल्याचं दिसून आलं होतं. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर येण्याची भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक लोकांचा मृत्यू देखील झाला होता.
पुरामुळे परिस्थिती बिकट

दरम्यान, 2022 मध्ये पाकिस्तानमध्येही पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. याचदरम्यान 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बाबा वेंगा यांनी काही शहरांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळाचीही भविष्यवाणी केली होती. मागील वर्षाच्या अखेरीस पोर्तुगालला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं तर इटलीमध्ये दुष्काळाची समस्या उघड झाली होती.
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा भाग?
