Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा

Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता. 

| Nov 07, 2024, 12:26 PM IST
1/7

फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

सकाळी ऑफिसला जाण्याची गडबड असते. अशावेळी गृहिणी रात्रीच चपात्यांचे पीठ मळून ठेवतात. पण फ्रीजमध्ये ठेवूनही कणिक काळी पडते. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा. 

2/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

कणिक फ्रीजमध्ये ठेवत असाल तर कधीच उघडे ठेवू नका. त्यामुळं ते खराब होतं. भिजवलेल्या कणकेचा गोळा एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. 

3/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

पीठ फ्रीजमध्ये ठेवताना ते चांगलं मळून घ्या. नंतर पीठावर तेलाचा किंवा तुपाचा पातळ थर लावा. यामुळं पीठ जास्त काळ मउ राहिल

4/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

मळलेले पीठ जास्तीत जास्त 48 तासांपर्यंत वापरात आणा. त्यानंतर ते खराब होण्यास सुरुवात होते

5/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

रात्री भिजवलेल्या पीठाच्या सकाळीच पोळ्या करुन घ्या. रात्रीसाठी पुन्हा तेच पीठ वापरु नका. त्यामुळं पोट बिघडू शकते. 

6/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

पीठ मळताना कोमट पाणी घ्या त्यामुळं पीठ मउ राहिल आणि काळपटदेखील पडणार नाही

7/7

how to store chapati dough fresh for long time Kitchen Tips

शिल्लक राहिलेले कणिक अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा, त्यामुळं ते काळे पडणार नाही