Kitchen Tips : स्वयंपाकघरातील भांड्याला अंड्याचा वास येतोय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Kitchen Tips in Marathi : सकाळी उठल्यावर अनेकांना नाश्त्यामध्ये अंड्याचे वेगवेगळे प्रकार खाय्याला आवडतात. पण अंडी उकळल्यानंतर किंवा त्यातून वेगवेगळे पदार्थ बनवल्यानंतर अनेकदा स्वयंपाकघरातील भांड्याना अंड्याचा उग्र वास राहून जातो. अशावेळी काय करायला हवे ते जाणून घेऊया... 

May 29, 2023, 12:12 PM IST
1/6

बेसनचा वापर

remove the smell of eggs fungus

भांड्याना अंड्यांचा वास येत असेल तर त्यात थोडे बेसन टाकून भांड्याना चोळा. थोडावेळ ती भांडी तशीच ठेवा. काहीवेळाने पाण्याने धुवून घ्या. वास जाण्यास मदत होईल.

2/6

व्हिनेगर

remove the smell of eggs fungus

भांडयाला येणाऱ्या अंड्यांचा वास दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी ज्या भांड्याला अंड्याचा वास येतोय, त्यामध्ये व्हिनेगर टाकावे लागेल. त्यानंतर अर्ध्या तासानंतर भांडे स्वच्छ पाण्याने धुवा. अंड्याचा वास काही मिनिटांत नाहीसा होईल.

3/6

बेकिंग सोडा

remove the smell of eggs fungus

भांड्यातून येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यात दोन चमचे सोडा आणि पाणी घालून वीस मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने भांडी स्वच्छ धुवा. असे केल्याने भांड्याला अंड्याचा उग्र वास येणार नाही. 

4/6

लिंबू आणि मिठाचा वापरा

remove the smell of eggs fungus

लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करुन भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करू शकता. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड तुमचे काम सोपे करू शकते. त्यामुळे यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करुन भांड्यांला काही वेळ भिजत ठेवा. त्यानंतर डिश वॉशने भांडी धुवा. त्यामुळे भांडी पूर्णपणे स्वच्छ होतील आणि अंड्याचा वास निघून जाईल. 

5/6

गरम पाण्याचा वापर

remove the smell of eggs fungus

अंड्याच्या भांडयाला स्वच्छ करण्यासाठी आणि दुर्गंधी घालविण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. या पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू टाकून मिसळून घ्या.. या पाण्याने भांडी साफ करा. त्यानंतर भांड्यातून येणारा अंड्याचा वास गायब होईल. 

6/6

चहा पावडरचा वापर करा

remove the smell of eggs fungus

अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही चहा पावडर वापरू शकता. यासाठी चहा बनवल्यानंतर त्यातील चहापावडर ही अंड्याच्या वास येणाऱ्या भांड्यामध्ये काहीवेळासाठी ठेवा. त्यानंतर ती चहा पावडर फेकून द्या आणि भांडी डिश वॉशने स्वच्छ करा. असे केल्याने भांड्याला येणारा अंड्याचा वास नाहीसा.