Kitchen Tips : पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे माशांचे लोणचे, पाहा रेसिपी
Kitchen Tips : सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ चवीला चांगले असल्यास, त्यांची मागणी देखील चांगली असते. असा एका पदार्थ्यांची रेसिपी आपण पाहणार आहोत. पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणारे कोळंबीचे लोणचे...
1/5

2/5
मासे पचनास हलके

3/5
जवळा चटणी

जवळा चटणी बनविण्यासाठी जवळा स्वच्छ करावा. पातेले गरम करून त्यात थोडे तेल टाकावे व स्वच्छ केलेला जवळा भाजून घ्यावा. थोड्या वेळाने थंड झालेल्या जवळ्यावर जिरे, राई, लसणाची फोडणी द्यावी. त्यात हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकून, जवळा चांगला खुसखुशीत होईपर्यंत परतवून घ्यावा. यात थोडेसे सायट्रिक आम्ल टाकून ढवळून घ्यावी. म्हणजे चटणी लवकर खराब होणार नाही. ही तयार झालेली चटणी 50 ते 100 ग्रॅम प्लॉस्टिकच्या पिशवीत हवाबंद पॅक करून घ्यावी.
4/5
कोळंबीचे लोणचे

सुरूवातीला कोळंबीचे डोके, कवच, पोटातील काळा दोरा काढून ती स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर ६ टक्के मिठाचे पाणी 10 ते 15 मिनिटे उकळून घ्यावीत. एका पातेल्यात तेल टाकून मोहरी चांगली तळून घ्यावी. त्यात लिंबाच्या फोडी व मीठ टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. त्यात हिंगाची फोडणी द्यावी. लाल तिखट, मिरी पावडर, हळद व लसूण टाकून दोन मिनिटे उकळून घ्यावे. सगळे पदार्थ टाकल्यानंतर हे मिश्रण तीन मिनिटे तापवावे. थंड झाल्यानंतर त्यात अॅस्कॉर्बिक आम्ल व व सोडियम बेंझोएट टाकावे. लोणच्याचा सामू 4 ते 5 च्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
5/5
ओल्या जवळ्याची भजी
