Valentine's Day 2021: वेगळ्या रंगाच्या गुलाबाचा काय आहे अर्थ?

Feb 07, 2021, 15:19 PM IST
1/5

Valentine's Day

Valentine's Day

व्हेलेंटाइन डेचा आज पहिला दिवस म्हणजेच रोज डे. रोज डेच्या दिवशी प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की आपल्या प्रेयसीला किंवा चांगल्य़ा मैत्रिणीला कोणत्या रंगाचा गुलाब द्यायला हवां. गुलाबाचं फुलं अनेक रंगांचे असतात. त्या वेग-वेगळ्या रंगांचे अर्थ देखील खास असतात. आजच्या दिवशी गुलाबाच्या फुलांना फार महत्त्व असतं. तर आपण जाणून घेवू वेग-वेगळ्या रंगांच्या गुलाबाचा अर्थ  

2/5

लाल गुलाब

लाल गुलाब

लाल गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतिक. प्रत्येक कपल्सच्या नव्या आयुष्या्ची सुरूवात लाल गुलाबाने होते. त्यामुळे तुम्हाला आज तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब नक्की द्या. 

3/5

पिवळं गुलाब

पिवळं गुलाब

पिवळ्या रंगाचा गुलाब चांगल्या मैत्रीचं प्रतिक असतं. म्हणून तुमच्या खास मैत्रीणीला किंवा मित्राला पिवळ्या रंगाचं गुलाब द्या.   

4/5

पांढरं गुलाब

पांढरं गुलाब

पांढरं  गुलाब शांतता आणि पवित्रतेचं प्रतिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील आई, आजी किंवा इतर व्यक्तीला पांढऱ्या गुलाबचं फुल द्या. 

5/5

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब

तुमच्या जीवनात जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहन देत असेल. तुम्ही ज्या व्यक्तीला रोल मॉडेल समजता त्यांना तुम्ही गुलाबी गुलाब देवू शकता.