चहा सोबत 'हे' पदार्थ खाल तर तब्बेत खराब कराल.. वाचा

तुम्ही जर चहासोबत किंवा चहानंतर लगेचच हे पदार्थ खाल्ल्यास तब्येत तुमची बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच पदार्थांची नावं सांगणार आहोत, (Bad Food Combination With Tea) जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.

Jul 16, 2022, 16:56 PM IST

मुंबई : बरीचं लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने (One cup of Tea) करतात. चहा पिणं हे बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. काहीजण चहासोबत बिस्किटे खातात, तर काही लोक चहासोबत काही चुकीचे पदार्थही खातात. त्यांना माहित नाही की चहासोबत असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने त्यांचे आरोग्य बिघडू शकतं.

1/5

हळदीचं सेवन करू नका

जर तुम्ही चहासोबत हळद खात असाल तर त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. खरं तर हळद आरोग्यासाठी चांगली असते, पण चहासोबत खाल्ल्याबरोबर चहामध्ये हळद मिसळून घेतल्यास पोट बिघडू शकतं.

2/5

आंबट पदार्थ खाऊ नका

तुम्ही अनेकांना लेमन टी पिताना पाहिलं असेल, पण दुधाच्या चहामध्ये लिंबू मिसळल्याने खूप नुकसान होतं. चहासोबत किंवा लगेच आंबट काहीही हानिकारक आहे

3/5

लोह समृद्ध भाजी

चहासोबत किंवा नंतर लोह असलेली भाजी किंवा लोह असलेली कोणतेही पदार्थ खाल्ल्याने पोट खराब होतं.

4/5

नट्स

बरेच लोक चहासोबत बदाम किंवा काजू खातात, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या पोषण स्रोतानुसार, नट्समध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्यामुळे चहासोबत नट्स खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

5/5

थंड गोष्टींपासून दूर राहा

बरेच लोक म्हणतात की चहासोबत थंड किंवा गरम खाऊ नये. हे खरं आहे कारण, चहा पिण्याच्या एक तास आधी थंड पिऊ नये किंवा चहा पिल्यानंतर पिऊ नये. ते आरोग्यास हानी पोहोचवते.