Petrol Price : पेट्रोल - डिझेलच्या किमतीबाबत नवे अपडेट, जाणून घ्या केव्हा होणार दरात कपात
Petrol Price : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे काल संकेत देण्यात आले होते. मात्र, ही दर कपात कधी होणार याची उत्सुकता होती. आता नवीन अपडेट समोर आली आहे. किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्यावर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.