lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

Mar 26, 2020, 15:36 PM IST
1/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्वत्र याचं पालन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थात काही ठिकाणं अद्यापही यासाठी अपवाद ठरत आहेत. नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची दहशत पाहता अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळण्यात येत आहे. 

2/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी भारतात विविध ठिकाणी हे सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेल्याचं पाहायला मिळालं. तिरुपती येथील अनेक भाजी मंडईंमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. 

3/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

सोशल डिस्टन्सिंगचं एकंदर हे असं चित्र लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दिसलं. फक्त भाजी मंडईच नव्हे, तर किराणा मालाच्या दुकानांवरही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. 

4/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

पाटणा येथेसुद्धा लॉकडाऊनमुळे नागरिकांनी पंतप्रधानांचा आदेश पाळत घरातच राहण्याला प्राधान्य दिलं. काही मोजके नागरिक वगळता रस्त्यांवरील गर्दी कमालीची कमी झाली आहे. 

5/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

दिल्लीमधील ओखला भाजीमंडईतही हेच चित्र दिसत आहे. (छाया सौजन्य - पूजा मक्कड) 

6/6

lockdown day 2 : दुसऱ्या दिवशी असा दिसतोय लॉकडाऊन भारत

आंध्र प्रदेशात पोलिसांच्या देखरेखीखाली सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे राखलं जात आहे.