व्यायाम आणि डाएटशिवाय पोटावरची चरबी 'अशी' करा दूर

lose weight without exercise:एकाच वेळी खूप खायचं आणि नंतर उपाशी राहायचं असं करु नका. असे केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभरात तुमचा आहार 6 भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे वजन संतुलित राहील आणि भूकदेखील नियंत्रणात राहील.

| Aug 22, 2023, 12:08 PM IST

lose weight without exercise: शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामशाळेत तासनतास घालवण्याची गरज नाही, तर दररोज काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कोणते नियम पाळावेत? याबद्दल जाणून घेऊया.

1/8

व्यायाम आणि डाएटशिवाय पोटावरची चरबी 'अशी' करा दूर

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

lose weight without exercise: वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणे, डाएट फॉलो करणे याचा  अनेकांना कंटाळा येतो. तुम्ही देखील यातलेच असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. काही सोप्या टिप्स फॉलो करुनही तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकता. 

2/8

चांगली आणि गाढ झोप

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

आधुनिक काळात अनेकांना निद्रानाशाच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी शरीराचे वजन झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दररोज चांगली आणि गाढ झोप घ्या. चांगल्या आणि गाढ झोपेने शरीराचे वाढते वजन झपाट्याने कमी करता येते. रोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. त्यामुळे तणाव आणि लठ्ठपणा नियंत्रणात येऊ शकतो.

3/8

प्रथिने आणि फायबर

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिने आणि फायबरयुक्त आहार घेऊन तुम्ही अति खाणे टाळू शकता, ज्यामुळे तुमचे शरीराचे वजन नियंत्रणात राहील. तसेच ते तुमच्या शरीराची उर्जा टिकून राहीलं.

4/8

पाणी पिणे

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

वजन कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी दर तासाला पाणी प्यावे. यासोबतच जेवण करण्यापूर्वी आणि त्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीराचे वजन नियंत्रणात राहील. तसेच, मेटाबॉलिझमला चालना मिळते, ज्यामुळे कॅलरी जलद बर्न होण्यास मदत होते.

5/8

भुकेपेक्षा कमी खा

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

आपल्यापैकी बरेच जण भूक लागल्यावर एकाच वेळी खूप खातात, त्यामुळे शरीराचे वजन वाढते. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर भूकेपेक्षा कमी खाण्याची सवय ठेवा. म्हणजेच 4 चपात्यांची भूक लागली असेल तर फक्त 3 चपात्या खा. कोशिंबीर, भाज्या, डाळी यांचाही आहारात समावेश करा.  

6/8

दिवसाच्या आहाराचे प्लानिंग

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

एकाच वेळी खूप खायचं आणि नंतर उपाशी राहायचं असं करु नका. असे केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभरात तुमचा आहार 6 भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे वजन संतुलित राहील आणि भूकदेखील नियंत्रणात राहील.

7/8

झोपायच्या 3 तास आधी खा

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

जेवल्यानंतर थेट झोपी जात असाल तर वजन खूप वेगाने वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी अन्न खा. यानंतर थोडा वेळ शतपावली करा. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण येईल. यासोबतच तुमचे शरीरही फिट राहील.

8/8

शरीराची हालचाल करा

lose weight without exercise and diet Follw simple Health Tips in Marathi

शरीर अॅक्टीव्ह ठेवा. याचा अर्थ तासनतास व्यायाम करा, असा होत नाही. तर एका जागी बराच वेळ स्थिर बसण्याऐवजी वेळोवेळी उठून हलका व्यायाम करा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.