छोटा बदल मोठा फायदा! LPG संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेची व्याप्ती वाढविली आहे. योजनेंतर्गत येत्या 2 वर्षात 1 कोटी मोफत कनेक्शन दिले जातील. याशिवाय मोदी सरकारने सिलिंडर्सच्याुरवठ्यासाठी बुकिंग करण्याचे नियमही बदलले आहेत. 

Mar 03, 2021, 14:11 PM IST
1/5

2 वर्षांत 1 कोटी फ्री कनेक्शन

2 वर्षांत 1 कोटी फ्री कनेक्शन

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. तेल सचिव तरुण कपूर यांनी सांगितले की, येत्या 2 वर्षात 1 कोटी मोफत कनेक्शनचे वितरण करण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे.  

2/5

हर घर तक सिलेंडर पहुंचाने की योजना

प्रत्येक घरात पोहोचवणार घरगुती गॅस

प्रत्येक घरात घरगुती सिलिंडर पोहोचवण्याची मोदी सरकारची योजना आहे. कमी कागदपत्रांमध्ये प्रत्येकाला घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होऊ शकणार आहे. रहिवाश पुराव्याशिवाय देखील गॅस कनेक्शन दिलं जाईस असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. 

3/5

योजनेसाठी कुठून आणणार पैसे

योजनेसाठी कुठून आणणार पैसे

उज्ज्वला योजनेंतर्गत साधारण 1 कोटी लोकांना घरगुती गॅस सुविधा देण्याची तयारी सुरू आहे. अर्थसंकल्पात यासंदर्भात कोणतीही वेगळी तरतूद करण्यात आली नाही. मात्र त्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

4/5

किती नागरिकांना मिळाला लाभ

किती नागरिकांना मिळाला लाभ

प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेंतर्गत 8 कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणखीन 1 कोटी नागरिकांना LPG कनेक्शन देण्याकडे मोदी सरकारचा कल आहे. घरगुती गॅस योजनेपासून वंचित राहिलेल्या लोकांना हा लाभ दिला जाईल.

5/5

काय होणार फायदा

काय होणार फायदा

सिलिंडर बुक करून देखील 4 ते 5 दिवस ग्राहकांना तो मिळत नाही अशी समस्या देखील काही ग्राहकांना उद्भवत आहे. गॅस संपला तर लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा ग्राहकांसाठी काही नियमांमध्ये बदल कऱण्यात आले आहेत. एकाच वेळी 3 डिलर्सकडून बुकिंग करता येणार आहे.