5 वर्षात CM शिंदेंच्या संपत्तीत 26 कोटींची वाढ! एकूण संपत्तीचा आकडा थक्क करणार; कर्जाचा तपशील उघड

Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2019 साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत यंदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा आकडा हा फार मोठा आहे. शिंदेंकडे नेमकी किती संपत्ती आहे. त्यांच्यावर किती कर्ज आहे जाणून घेऊयात..

| Oct 29, 2024, 07:39 AM IST
1/9

shindeproperty

मुख्यमंत्र्यांची संपत्ती 2019 मध्ये नेमकी किती होती आणि आता ती किती झाली आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...

2/9

shindeproperty

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठं शक्तीप्रदर्शन करत शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  

3/9

shindeproperty

मुख्यमंत्री शिंदेंनी रॅली काढल्यानंतर दाखल केलेल्या उमेदवारी अर्जबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीचं विवरण दिलं आहे. 2019 च्या तुलनेत यंदाच्या संपत्तीचा विचार केल्यास मागील पाच वर्षात शिंदेंची संपत्ती 26 कोटी 11 लाख 85 हजारांची वाढ झाली आहे.

4/9

shindeproperty

60 वर्षीय शिंदेंचं शिक्षण बीएससीपर्यंत झालं आहे. 2019 सालाच्या अर्जाबरोबर दाखल केलेल्या अर्जामधील तपशीलानुसार त्यांची एकूण संपत्ती 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 इतकी होती.  

5/9

shindeproperty

2022 साली बंडखोरीचं नेतृत्व केल्यानंतर शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर ते मागील अडीच वर्षांपासून राज्याचे प्रमुख आहेत. 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या काळात शिंदेंच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

6/9

shindeproperty

2024 च्या प्रतिज्ञापत्रानुसार शिंदेंची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये इतकी आहे. तसेच शिंदेंनी त्यांच्या नावावर 18 गुन्हे दाखल असून यापैकी एकही गंभीर गुन्हा नाही.  

7/9

shindeproperty

शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावरील जंगम मालमत्ता 1 कोटी 44 लाख 57 हजार 155 हजार रुपये इतकी असून पत्नीच्या नावावर 7 कोटी 77 लाख 20 हजार 995 रुपये इतकी आहे. पती पत्नीच्या नावावर एकूण 9 कोटी 21 लाख 78 हजार 150 रुपये इतकी संपत्ती आहे.

8/9

shindeproperty

स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यमंत्र्यांच्या नावावर 13 कोटी 38 लाख 50 हजार रुपयांची संपत्ती आहे. तर पत्नीच्या नावावर 15 कोटी 8 लाख 30 हजार रुपयांची स्थावर संपत्ती आहे.   

9/9

shindeproperty

मुख्यमंत्री शिंदेंवर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपये कर्ज असून पत्नीवरील कर्जाची रक्कम 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 इतकी असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.