मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट, शिंदेंच्या दिल्लीवारीनं राज्यात चर्चांना उधाण...

CM Eknath Shinde : भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या (NDA) बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्लीवारी केली होती. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली.  आज दुपारी एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

RamRaje Shinde | Jul 22, 2023, 14:08 PM IST
1/5

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीत आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर सकाळी 11 वाजल्यानंतर ही भेट झाली. जवळपास एक तास मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 

2/5

मुख्यमंत्री शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, पत्नी, सून, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ही भेट झाली. तर 4 वाजता अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

3/5

या बैठकीत राज्य आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. पण आमच्या कुटुंबाची इच्छा होती की पंतप्रधान मोदींची सचिच्छा भेट घ्यावी, सर्वांनी भेट घेतली. सर्वांना समाधान वाटलं, मोदीजींनी खूप वेळ दिला असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

4/5

पंतप्रधानांबरोबरच्या भेटीत राज्यात सुरु असलेले प्रकल्प, पावसाची परिस्तिथी याबरोबरच राज्यातील शेतकरी योजना, पायाभूत सुविधा आणि महत्त्वाचे प्रकल्प यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मेट्रो प्रकल्प, मराठवाडा वॅाटर ग्रीड, पावसाचे पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळवावे यावर देखील चर्चा झाली. तसंच जनतेच्या हिताच्या प्रकल्पाला केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास पंतप्रधानांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

5/5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवड्याभरातील ही दुसरी दिल्लीवारी आहे. NDA बैठकीपाठोपाठ तीन दिवसात एकनाथ शिंदे पुन्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची सध्या चर्चा रंगली आहे.