...म्हणून महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार 9 कोटी रुपये; 'ती' एक चूक पडली महागात

Maharashtra Government 9 Crore To SRK : अभिनेता शाहरुख खान हा देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकार शाहरुखला 9 कोटी रुपये देणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घ्या... 

Swapnil Ghangale | Jan 27, 2025, 08:59 AM IST
1/9

srk9cr

7300 कोटी रुपयांचा मालक असलेल्या शाहरुख खानला महाराष्ट्र सरकार 9 कोटी रुपये का देणार आहे जाणून घ्या सविस्तरपणे...

2/9

srk9cr

महाराष्ट्र सरकार बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याच्या पत्नीला म्हणजेच गौरी खानला 9 कोटी रुपये देणार आहे. मात्र अचानक महाराष्ट्र सरकार शाहरुखला 9 कोटी रुपये का देणार असा प्रश्न अनेकांना पडाला आहे.  

3/9

srk9cr

झालं असं की 'मन्नत' बंगला उभा असलेल्या जमीनीची लिज कायमस्वरुपी स्वत:च्या नावावर करुन घेताना शाहरुख खानने काही कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे जमा केली होती.   

4/9

srk9cr

शाहरुखने भरलेल्या रक्कमेमध्ये 9 कोटी रुपये अतिरिक्त भरण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. हेच 9 कोटी रुपये आता महाराष्ट्र सरकारकडून शहारुखला दिले जाणार आहेत.   

5/9

srk9cr

उपनगरीय जिल्हाधिकारी सतिश बगल यांनी, 'क्लास 1 कम्पलिट ओनरशीप'चा करार 2019 मध्ये झाला. यासाठी शाहरुख आणि त्याच्या पत्नीने सरकारला ठराविक रक्कम दिली होती.  

6/9

srk9cr

मात्र या व्यवहारामध्ये शाहरुखने अपेक्षित रक्कम जमा केल्यानंतर सदर व्यवहारासाठी आकारण्यात आलेली रक्कम चुकीच्या पद्धतीने आकडेमोड करुन निश्चित कऱण्यात आल्याचं समोर आलं. जेवढी रक्कम या प्रक्रियेसाठी लागते त्यापेक्षा जास्त रक्कम शाहरुख आणि गौरीकडून आकारण्यात आल्याचं उघडं झालं. 

7/9

srk9cr

ही बाब समोर आल्यानंतर शाहरुख खानने रिफंडसाठी अर्ज केला. हा अर्ज आणि उडालेला गोंधळ मान्य करताना शाहरुखला पैसे करत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

8/9

srk9cr

शाहरुख खानने सरकारकडे जमिनीचं मूल्य पाहता 25 कोटी रुपये जमा केले होते, असं सांगितलं जात आहे. मात्र या संदर्भात अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.   

9/9

srk9cr

तरी आता शाहरुखला महाराष्ट्र सरकाकडून नक्कीच 9 कोटी रुपये परत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.