हळदीचं दूध कोणी पिऊ नये; जाणून घ्या कारण नाहीतर...

हळदीचं दूध आरोग्यासाठी सगळ्यात जास्त फायदेकार आहे. असं म्हटलं जातं की हळदीचं दूध प्यायल्यानं इम्यूनिटी बूस्ट होती. तुम्हाला माहित आहे का की काही लोकांनी हळदीचं दूध प्यायला नको. या लोकांनी हळदीचं दूध प्यायल्यानं त्यांना नुकसान होऊ शकतं. चला तर जाणून घेऊया कोणी हळदीचं दूध प्यायला नको. 

Diksha Patil | Jan 26, 2025, 18:53 PM IST
1/7

हळदीचं दूध प्यायल्यानं अतिसार होऊ शकतं. ज्या लोकांना आधीच अतिसार होत असेल किंवा समस्या आहे. त्यांनी हळदीचं दूध टाळावं. 

2/7

ज्या लोकांना मळमळ होत असेल किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही हळदीच दूध पिऊ नका. कारण जर तुम्ही हळदीचं दूध प्यायलात तर अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. 

3/7

हळद ही गरम असते, अशात पित्त असलेल्या लोकांनी हळदीचं दूध पिऊ नये. त्यामुळे पित्त वाढू शकतं. पित्त दोष वाढल्यानं शरीरातील गरमी वाढू शकते. 

4/7

पोट दुखण्याची समस्या असेल तर तेव्हा हळदीचं दूध पिऊ नका. हळदीचं दूध प्यायल्यानं पोट दुखी वाढू शकते. 

5/7

पोटात जळजळ होऊ शकते. त्याशिवाय पोट दुखीचं कारण हे हळदीत असलेलं करक्यूमिन आहे. 

6/7

स्किन अ‍ॅलर्जीची समस्या असलेल्या लोकांनी हळदीचं दूध पिऊ नये. हळदीचं दूध प्यायल्यानं त्वचे संबंधीत आजार हे वाढू शकतात. 

7/7

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)