महाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत पाहूयात...

| Dec 05, 2024, 11:35 AM IST
1/13

ajitpawardcmpost

अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील तेव्हा ते कितव्यांदा उपमुख्यमंत्री होतील? जाणून घ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास आणि ते कधी कधी उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

2/13

ajitpawardcmpost

'संध्याकाळपर्यंत त्यांचं (एकनाथ शिंदेंचं) समजणार आहे. मी तर (शपथ) घेणार आहे. मी थांबणार नाही,' असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज होणाऱ्या शपथविधीच्या एक दिवस आधीच पत्रकारांसमोर जाहीरपणे सांगितल्यानंतर अगदी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही हसू अनावर झालं.  

3/13

ajitpawardcmpost

अजित पवारांनी स्वत: आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं असून ते पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील तेव्हा ते सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे नेते ठरणार आहेत. मात्र अजित पवार नेमके कधी कधी मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे पाहूयात...

4/13

ajitpawardcmpost

अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. 

5/13

ajitpawardcmpost

महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण असून त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. 

6/13

ajitpawardcmpost

मात्र जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप अजित पवारांवर करण्यात आले होते.   

7/13

ajitpawardcmpost

काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण तीन दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.  

8/13

ajitpawardcmpost

2019 च्या सत्ता नाट्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.  

9/13

ajitpawardcmpost

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. 

10/13

ajitpawardcmpost

त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. ही त्यांची उपमुख्यमंत्रिपदाची पाचवी टर्म ठरली. आज ते पुन्हा महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा या पदाची शपथ घेणार आहेत.  

11/13

ajitpawardcmpost

अजित पवार कधी कधी उपमुख्यमंत्री राहिले आहेत त्याची यादी पुढील प्रमाणे : सर्वात आधी अजित पवार नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 असे दोन वर्ष काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले.  

12/13

ajitpawardcmpost

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा दुसरा कार्यकाळ हा काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्येच ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 असा होता. त्यानंतर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर ते तीन दिवसांचे उपमुख्यमंत्री राहिले.  

13/13

ajitpawardcmpost

डिसेंबर 2019 ते जून 2022 दरम्यान अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बंड करुन सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले.