'कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही' धनंजय मुंडे यांनी लाडक्या बहिणींसह भरला उमेदवारी अर्ज
Dhananjay Munde : परळी मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंज मुंडे यांनी आमदार पंकजा मुंडे आणि डॉ.प्रीतम मुंडे या लाडक्या बहिणींच्या सोबतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धनुभाऊ जिंकतील हा मला पूर्ण विश्वास असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचंही सांगितलं.
2/8
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणी आणि विधान परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सोबतीने आपला उमेदवारी अर्ज आज परळी इथल्या तहसील कार्यालयात दाखल केला. धनंजय मुंडे यांनी कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी सुचकाची भूमिका निभावली.
3/8
अर्ज दाखल करण्यापूर्वी नाथरा इंथल्या निवासस्थानी धनंजय मुंडे यांचं आई रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नाथरा इथल्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळी पांगरी इथल्या गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना नमन केलं.
4/8
5/8
6/8
परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर धनंजय मुंडे हे आपल्या आमदार पंकजा, डॉ.प्रीतम मुंडे आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला.
7/8
आपण कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो, लोकसभा असो किंवा विधानसभा असो, प्रत्येक निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढत असतो; त्यामुळे यशाची हमखास खात्री मिळते. विरोधकांना कोण उमेदवार मिळेल किंवा आपल्या विरोधात कोण उभे असेल याबाबतची काळजी न करता मी आजवर केलेली कामे आणि माझ्या मनात असलेले विकासाचे व्हिजन घेऊन लोकांमध्ये जाणार आहे आणि स्वतःसाठी मतदान रुपी आशीर्वाद मागणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
8/8