जगातील सर्वात महागडी वेब सीरिज, 1-1 एपिसोड तब्बल 500 कोटींचा; संपूर्ण बजेट तर...
तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडी वेबसिरीज कोणती आहे ते? याचा एक एपिसोड इतका महाग आहे की जवानपासून ते ब्रह्मास्त्र चित्रपटाचे संपूर्ण बजेट येईल. जगभरात या टीव्ही शो खूप चर्चेत आहे. आम्ही आज तुम्हाला या वेबसिरीजबद्दल सांगणार आहोत.
World Most Expensive Web Series: तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडी वेबसिरीज कोणती आहे ते? याचा एक एपिसोड इतका महाग आहे की जवानपासून ते ब्रह्मास्त्र चित्रपटाचे संपूर्ण बजेट येईल. जगभरात या टीव्ही शो खूप चर्चेत आहे. आम्ही आज तुम्हाला या वेबसिरीजबद्दल सांगणार आहोत.
जगातील सर्वात महागडी वेब सीरिज, 1-1 एपिसोड तब्बल 500 कोटींचा; संपूर्ण बजेट तर...

तुम्ही कधी जगातील सर्वात महागडी वेबसिरीज पाहिलीत का? या वेबसिरीजचा एक एपिसोड इतका महाग आहे की यात दहा चित्रपट बनवता येतील. आजपर्यंत या टिव्ही सिरीजचा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही. सगळ्यात मोठ्या टीव्ही सीरिजचे नाव द लॉर्ड ऑफ रिंग्स: रिंग्स ऑफ पॉवर असं आहे. या सिरीजने इतिहास रचला आहे. याचा पहिला सिझन 2022 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे.



चित्रपटांबद्दल बोलायचे तर, 'वॉर्स: द फोर्स अवेकन्स'ने सर्वात महागड्या चित्रपटाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याचे बजेट सुमारे 447 दशलक्ष डॉलर्स आहे. पण 'द रिंग्ज ऑफ पॉवर'ला मागे टाकण्यात मात्र अयशस्वी ठरला आहे. 'द रिंग्ज ऑफ पॉवर'चा दुसरा सीझनही आला आहे. तो 2024 मध्ये फक्त OTT वर रिलीज झाला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती.

द रिंग्ज ऑफ पॉवरची भारतीय चित्रपटांशी तुलना केली, तर प्रत्येक भागाचे बजेट एका चित्रपटापेक्षा जास्त आहे. देशातील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत कल्की 2898AD, RRR आणि आदिपुरुष आहेत. मात्र या सर्व चित्रपटांचे बजेट 70 ते 75 दशलक्ष डॉलर्स इतकेच आहे. जे 'द रिंग्ज ऑफ पॉवर' सीझन 1 च्या किमतीच्या 1/15 वा हिस्सा आहे.
