4000 फूट उंचीवर फक्त एका खांबावर उभं असलेलं रहस्यमयी मंदिर

अनेकदा आपल्या अवतीभोवती निसर्गात चमत्कार घडत असतात.निसर्ग आणि देव यांच मिलन आपल्याला अनेक मंदिरांमध्ये पहायला मिळतं. पण तुम्हाला एक असं मंदिर माहित आहे का 4000 फूट उंचावर फक्त एका खांबावर उभं आहे. महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे जे  वर्षानुवर्ष एक रहस्यच राहिले आहे.   

Aug 07, 2024, 13:21 PM IST
1/7

महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये स्थित असलेली केदारेश्वर गुंफा तिच्या अलौकिक सौंदर्यामुळे वर्षानुवर्ष  लोकांना आकर्षित करत आहे.  

2/7

खूर्चीला उभं राहण्यासाठी देखील 4 पाय लागतात. जर खूर्ची एका पायावर उभी असती तर? असाच चमत्कार बऱ्याच वर्षापासून या मंदिरात घडत आहे

3/7

हरिशचंद्र गडावर हे मंदिर आहे. असं म्हणतात की हे मंदिर सहाव्या शतकामध्ये कलाचुरी राजघराण्याने बांधले होते पण किल्ल्यातील गुहा या 11व्या शतकात सापडल्या. 

4/7

येथील शिवलिंग नैसर्गिकरीत्या तयार झाल्यामुळे ते मंदिर अत्यंत मानाचे समजले जाते.हे मंदिर किल्ल्याच्या आत 4,671 फूट उंचीवर बांधले आहे. 

5/7

मंदिराजवळ तीन गुहा आहेत ज्यामध्ये उजव्या गुहेत बर्फाच्या थंड पाण्याच्या मधोमध 5 फूट उंच शिवलिंग आहे.या मंदिराचा एकच खांब जमिनीला जोडलेला आहे.   

6/7

हिंदू विश्वशास्त्रानुसार हे 4 स्तंभ 4 युग दर्शवतो.सत्ययुग, त्रेतायुग, व्दापरयुग आणि कलियुग. यातील 3 खांब पडल्यामुळे मंदिर फक्त एका खांबावर उभं आहे. 

7/7

तसेच बदलत्या युगानुसार हे खांब आपली उंची बदलते असे म्हटले जाते.यासोबतच शिवलिंगाच्या भोवती असलेले पाण्याचे तापमान देखील बदलते. उन्हाळ्यात बर्फाळ थंड असलेले पाणी हिवाळ्यात मात्र कोमट पाण्यात रूपांतर होते.