Mahashivratri Puja Tips: तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध का अर्पण करू नये? जाणून घ्या कारण

Maha Shivratri 2025 : 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. सनातनधर्मात महाशिवरात्रीचं एक विशेष महत्व असून या दिवशी देवी पार्वती यांचा भगवान शंकरा सोबत विवाह झाला होता.   

Pooja Pawar | Feb 18, 2025, 15:59 PM IST
1/7

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच शिवलिंगाची पूजा करण्याला विशेष महत्व दिले जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. यापैकीच एक म्हणजे दूध. भक्तगण शिवलिंगावर सर्वात जास्त दूध अर्पण करतात. 

2/7

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार तांब्याला हिंदू धर्मात शुद्ध धातू मानले जाते. तांब्याच्या वस्तूत तुम्ही काहीही ठेवल्यास ते वस्तूची पवित्रता सर्वाधिक राखते. तसेच दूध एक असा पदार्थ आहे, जे जवळपास प्रत्येक पूजा कार्यात वापरले जाते.  

3/7

 घरात कोणतीही धातूची वस्तू जसे तांबे, पितळ, सोने, चांदी इत्यादी आणल्यानंतरही ते प्रथम दुधाने धुतले जाते कारण दूधात वस्तूची नकारात्मकता काढण्याचा एक आश्चर्यकारक गुणधर्म असतो. 

4/7

परंतु तरी देखील तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध अर्पण करण्यास मनाई केली जाते. याच्यामागचं कारण देखील दुधाच्या दिव्य शक्तींशीच जोडलेलं आहे.   

5/7

दूध कोणत्याही वस्तूंमधून नकारात्मकता खेचून घेते. अशाच प्रकारे तांब्याच्या कलशाच्या आसपास कोणती अशुद्धता असेल तर तांब्याच्या भांड्यात दूध भरल्यावर त्याची अशुद्धता त्या भांड्याच्या आसपास एकत्रित होते.  

6/7

परिणामी त्या तांब्याच्या कलशात असलेले दूध सुद्धा नकारात्मकता आणि अशुद्धतेमुळे अपवित्र होते. त्यानंतर हे दूध शिवलिंगावर अर्पण करण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे असेही म्हटले जाते की तांब्याच्या कलशातील दूध दारू समान मानले जाते. त्यामुळे तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर दूध अर्पण केले जात नाही. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)