अवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?
Mahila Samman Savings Certificate: सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते.
Mahila Samman Savings Certificate: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही वन टाईम सेव्हिंग स्किम आहे. यामध्ये व्याजाची मोजणी तिमाही चक्रवाढ आधारावर असते. योजनेच्या शेवटी एकूण व्याज परतावा दिला जातो. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 40% रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.